भगवान टोळीने अत्तापर्यंन्त दहा ते पंधरा जणांना केले ब्लॉकमेल – रमेश आजबे.
अंदुरे कुटूंबियांच्या पाठीशी व्यापाऱ्यांनी खंबीरपणे उभे राहावे – रमेश आजबे
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यात एक भगवान टोळी निर्माण झाली आहे. या टोळीचे अध्यक्ष पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवान मुरुमकर आहेत. त्यांची टोळी गावात दहशद निर्माण करत आहेत. या भगवान टोळीने व्यापाऱ्यांना दहशद निर्माण करुन अत्तापर्यंन्त दहा ते पंधरा जणांना ब्लॉकमेल करुन खांडणी वसुल केली आहे. मी सुध्दा या टोळीचा शिकारी आसुन त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी आशी मागणी जामखेड येथिल व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.
जामखेड येथिल अंदुरे कुटूंबाला खांडणी मागीतल्या प्रकरणी जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवान मुरुमकर यांच्या सह एकुण आठ जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. याच अनुशंगाने जामखेड येथिल व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत घेतली या वेळी त्यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की भगवान टोळीचे सात सदस्य आहेत या मध्ये आनखी दोघे नविन सामिल झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच जामखेड येथे व्यापारी अंदुरे कुटूंबाला ब्लॅकमेल करुन खांडणी उखळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या टोळीवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझ्यावर देखील हीच वेळ आली होती मला देखील ब्लॅकमेल करण्यात आले आहे. माझी स्वतःची जागा झोपडपट्टी या ठीकाणी आहे या मध्ये देखील मला एक लाख रूपये द्यावे लागले मात्र पैसै देऊनही या गँग मधिल लोक मला आनखी पैसै मागत आसुन माझ्या गाळ्याचा ताबा त्यांनी घेतला आहे. माझ्या प्रकरणात देखील याच मास्टरमाईंन्ड डॉ भगवान मुरुमकर यांचा हात आहे.
डॉ भगवान मुरुमकर यांना कोण साथ देत आहे याची चौकशी झाली पाहिजे. अंदुरे कुटूंब अतिशय शांत व संयमी आहे. अंदुरे परीवाराला बदनाम कसे करायचे त्यांचे वस्त्रहरण कसे करायचे हा त्यांचा डाव आहे. याबाबत अंदुरे कुटूंबाला कशा पद्धतीने त्रास दिला याचे कॉल रेकॉर्डिंग व व्हीडिओ देखील अंदुरे कुटूंबाकडे आहेत.
भगवान टोळीने या पुर्वी देखील जामखेड शहरातील मुख्य पेठेतील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या गाळ्याचा ताबा घेऊन त्या दुकानाला टाळे लावले होते. त्या व्यापाऱ्यास ब्लॉकमेल करुन त्यांच्या कडुन १० ते ११ लाख रुपये उखळले आहेत. तसेच शहरातील एका मोबाईल शॉप दुकान मालकास देखील ब्लॉकमेल केले आहे. तसेच जामखेड येथिल आनेक कला केंद्रावर देखील ही टोळी जाऊन त्रास देऊन पैसै उखळत आहे.
या बाबत या टोळी विरोधात गेल्यावर यातील काही जण तुमच्यावर ॲट्रोसीटीचा गुन्हा दाखल करु अशा धमक्या देतात. व्यापारी वर्गाला देखील माझी विनंती आहे की अन्याय झालेल्या अंदुरे कुटूंबाच्या सोबत ठाम पणे उभे रहावे अन्यथा तुमच्याववर देखील अंदुरे कुटूंबा सारखी वेळ यायला वेळ लागणार नाही. व्यापाऱ्यांनी आवाज उठवला नाही तर जामखेड च्या बाजारपेठेस मोठा धोका निर्माण होईल. दोन दिवसात माझ्या गाळ्याचा ताबा घेण्यासाठी मी स्वतः जाणार आहे. मात्र त्यावेळी काही अनुचित प्रकार घडला तर याला डॉक्टर भगवान मुरुमकर व त्यांचे साथीदार हे जबाबदार असतील.
खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी आजुनही मोकाटच
अंदुरे कुटूंबाने खंडणीचा गुन्हा दाखल केलेले आरोपी अद्यापही मोकाट फीरत आहेत. संबंधित आरोपी हे त्यांच्या दारासमोर गाड्या लाऊन दहशत निर्माण करतात त्यामुळे पुन्हा अंदुरे कुटूंबाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. सर्व साधारण लोकांवर गुन्हा दाखल झाला तर पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात मात्र अंदुरे कुटूंबातील दोन जण नगर येथे उपचार घेत असुन देखील अद्यापही या गुन्ह्य़ातील आरोपी अद्याप मोकाटच फीरत आहेत त्यामुळे पोलीसांनी तातडीने त्यांना अटक करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.