अखेर नगर जामखेड रोडवरील राष्ट्रीय महामार्गाच्या साबलखेड ते चिंचपुर रस्ता कामाची निविदा मंजुर
१३० कोटी निधी मंजुर, लवकरच कामाला सुरुवात
जामखेड प्रतिनिधी
नगर जामखेड रोडवरील आसलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील साबलखेड ते चिंचपूर रस्ता व्हावा यासाठी अनेक आंदोलने झाली मात्र या रस्त्याला नीधी मंजूर होत नव्हता आखेर या राष्ट्रीय महामार्ग विभागाने रखडलेल्या साबलखेड चिचपुर रस्ता कामाची निविदा काढली असुन यासाठी १३० कोटी रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती महामार्ग अभियंता आर.व्ही भोपळे यांनी दिली.
जामखेड नगर रोडवरील राष्ट्रीय महामार्गावरील साबलखेड ते चिंचपुर या रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून गुडघ्या एवढे खड्डे पडल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. या रस्त्याची दयनीय अवस्था निर्माण झाली असून दररोज अपघात घडत आहेत. खड्ड्यातुन प्रवास करताना आदळ आपटीत मणके ढिल्ले झाले तरी प्रशासनाला कसल्याच कळा बसत नव्हत्या. या वेळी अनेक आंदोलने देखील झाली होती.
गेल्या अनेक महिन्यांपासून जामखेड नगर राष्ट्रीय महामार्गावरील साबलखेड चिचपुर हे रस्ता काम अर्धवट राहिल्याने दररोज अपघात घडत आहेत. आजवर ५० ते ५५ जणांचा बळी या रस्त्याने घेतला असून ५०० च्या वर नागरिक जखमी झाले तर अनेकांच्या दुचाकी, चारचाकी खड्यात आदळ आपट होऊन अनेकांचे मणके ढिल्ले झाले आहेत.
हा रस्ता अंत्यत खराब झाल्याने महामार्ग विभागाकडून वेळोवेळी याकडे दुर्लक्ष होत असताना उपोषण,आंदोलन, रस्तारोको, गांधीगिरी करून देखील याकडे कसलेच लक्ष न देता पदरमोड करून खड्डे बुजवतोय असे बोलुन अधिकाऱ्यांकडून मलमपट्टी करण्यात आली. या रस्त्याच्या दयनीय अवस्थे संदर्भात वेळोवेळो वृत्त प्रकाशित करून प्रकाश टाकला.
त्यानंतर महामार्ग विभागाकडून याची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून १३० कोटी रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे. १७ महिन्यांत हे काम पुर्ण करायचे असुन हा रस्ता पूर्ण सिमेंट काॅक्रेंटचा होणार आहे.या रस्ता कामाचा सर्व्हे आठ दिवसात सुरू होणार आहे .सिमेंट काॅक्रेटच्या प्रत्येक्ष कामाला डिसेंबर अखेर सुरूवात होणार असून,हा रस्ता लवकरच पुर्ण होणार असल्याची माहिती महामार्ग विभागाचे अभियंता आर.व्ही.भोपळे यांनी बोलताना दिली.