गुरुमाऊली 2015 तांबे गटाचा संतोष डमाळे यांच्या नेतृत्वाखाली खर्डा-तेलंगशी भागात प्रचाराचा झंझावात

जामखेड प्रतिनिधी

गुरुमाऊली 2015 तांबे गटाचा संतोष डमाळे यांच्या नेतृत्वाखाली खर्डा-तेलंगशी भागात प्रचाराचा झंझावात सुरू झाला. या सुरू केलेल्या प्रचारास सभासदांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

जामखेड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष एकनाथ दादा चव्हाण, उपाध्यक्ष नानासाहेब मोरे,अर्जुन पवार, अनिलकुमार भोसले यांनी झंझावाती प्रचार भैरवनाथ भैरवनाथाचे आशीर्वाद घेऊन शिऊर येथून सुरू केला. महात्मा फुले नगर, बसरवाडी, देवदैठण, धामणगाव, सोनारवाडा, सरगरवस्ती, तेलंगशी, ढाळेवस्ती, श्रीरामनगर, मोहरी, घुगेवस्ती, दिघोळ, जातेगाव, माळेवाडी, खर्डा मुले, खर्डा मुली, खर्डा उर्दू या ठिकाणी प्रचाराची रणधुमाळी करीत सर्व शिक्षक सभासद मतदारांना गुरुमाऊली मंडळ 2015 बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक बँकेची होत असलेली भरभराट ,त्याचबरोबर सभासदांना दिलेला अविस्मरणीय विश्वास आणि सभासदांची वाढवलेली पत यांद्वारे शिक्षक बँकेच्या राजकारणात एक वेगळा ट्विस्ट येऊन बसलेला असून याप्रसंगी शिक्षक नेते संतोष डमाळे यांच्या नेतृत्वाखाली सभासदांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here