

अरणगाव परीसरात दिड महीन्यात पाच बैलजोडीची झाली चोरी
अरणगावसह, पाटोदा, डोणगाव, खामगाव परिसरातून बैलचोरी
जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील अरणगाव येथून दि. १२ रोजी रात्री १२ ते ५ वेळेत बैलचोरी झाली. या बैलचोरीच्या घटनेमुळे शेतकऱ्यांन मध्ये घबराट निर्माण झाली असून पोळा सणापासून ते आजतागायत अरणगाव येथे पाच शेतकऱ्यांच्या बैलजोडी चोरीला गेली आहे तर अरणगाव परीसरातील पाटोदा गरडाचे, खामगाव व डोणगाव येथे बैलचोरी झाल्याची घटना घडलेल्या आहेत. यामुळे पोलीसापुढे बैलचोरांनी आव्हान निर्माण केले आहे.

जामखेड पोलीसात तालुक्यातील अरणगाव येथील शेतकरी संजय नानासाहेब नन्नवरे (वय ३२, रा. हनुमानवस्ती) यांनी फिर्याद दिली की दि. ११ च्या १२ वाजता ते दि.१२ च्या पहाटेच्या पाच च्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरटय़ांनी गोठ्यासमोर बांधलेली ६० हजार रुपये किमतीची खिल्लारी बैलजोडी चोरून नेली आहे. सदर घटनास्थळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास करीत आहेत.

अरणगाव, पारेवाडी शिवारातून मागील दिड महिन्यापासून बैलचोरीच्या घटना घडल्या आहेत. अरणगाव येथील विठ्ठल गदादे, दत्तराय नन्नवरे, मथुरदास मोहळकर नाना नन्नवरे, पारेवाडी येथील नवनाथ पारे यांच्या बैलजोडीची चोरी झाली आहे. तसेच अरणगाव पासुन ५ ते ६ कि. मी अंतरावर असलेले पाटोदा, खामगाव, डोणगाव येथील बैलं चोरीला गेले आहेत. बैलचोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने पोलीसांनी याबाबत तपास कठोर करण्याची मागणी अरणगाव व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी केली आहे.








