

घरासमोर दबा धरून बसलेल्या बिबट्याची तरुणीवर झेप; तरुणीला फरफटत गेला घेऊन,
शिरूर( पुणे): शिरूर तालुक्यातील जांबुत येथे घरासमोर दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका १९ वर्षीय तरुणीला फरफट नेऊन फडशा पाडला आहे. या गेल्या काही दिवसातली ही दुसरी घटना आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मानसाच्या आविष्यात मृत्यू कसा व कधी येईल हे कधीच सांगता येत नाही. अशीच घटना पुणे जिल्ह्य़ातील शिरुर तालुक्यातील जांबु या गावात घडली आहे. पुजा भगवान नरवडे असे हलल्यात मृत झालेल्या तरुणीचे नाव असून बिबट्याने तरुणीला २०० फुटापर्यंत फरफट नेले. बिबट्याने संबंधित तरुणीचा गळ्याचा भाग पकडला असल्याने काही क्षणात तिचा मृत्यू झाला आहे. काल दि १३ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जांबूत परिसरातील जोरीमळा येथे सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पुजा ही काही कामासाठी बाहेर आली होती. मात्र जवळच दबा धरून बसलेला बिबट्या तिला दिसला नाही. बिबट्याने तिच्या अंगावर झेप घेत तिच्या गळ्याचा भाग पकडला. त्यानंतर बिबट्याने तिला उसाच्या शेतात २०० फुट अंतरावर ओढत नेले.

हल्ला झाल्यानंतर ही घटना मुलीच्या आईने पाहिले, या नंतर तीने आरडा ओरडा केला. मदतीसाठी शेजारी राहणाऱ्या व्यक्ती धावूनही आल्या. माणसं येताना पाहतच बिबट्याने तरुणीला सोडून घटनास्थळावरून धूम ठोकली. तिच्या मानेला खोलवर जखम झाल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला. जांबूत येथे हल्ल्याची ही दुसरी दुर्दैवी घटना आहे.

या अगोदर या परिसरात सचिन जोरी या तरुणाचा बिबट्याच्या हल्यात मृत्यू झाला होता. ती घटना ताजी असतानाच आज अचानक ही घटना घडल्याने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. तरी या भागात पिंजरा लावावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. बिबट्याच्या हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे वनविभागाने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे नाहीतर असे बळी जातील.







