पारनेरच्या सरकारी कंत्राटदारावर झाला गोळीबार; स्वप्निल आग्रे गोळीबारात जखमी

पारनेर प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील मांडओहोळ ते म्हसोबा झाप रोडवर सरकारी कंत्राटदार स्वप्नील जयसिंग आग्रे वय २५ हे त्यांच्या चार चाकी वाहनातून जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्याच्या वाहनावर गोळीबार केला.त्यात स्वप्नील आग्रे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नगरला हलविण्यात आले आहे.

दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच परिसरातील तरुणांनी पोखरीकडे जाणार्‍या रस्त्यावरील गावांमधील तरुणांना गाडीची व घटनेची माहिती दिली. यानंतर तरुणांनी सदर गाडी पोखरी परिसरात रोखली. गाडीतील तरुणांच्या हातात दोन गावठी कट्टे होते. या तरुणांना स्थानिक तरुण व ग्रामस्थांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.

आज दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. जखमी आग्रे यांच्या छातीमध्ये उजव्या बाजूला दोन गोळ्या लागल्या आहेत. जखमी आग्रे यांना उपचारासाठी प्रथम टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, गोळीबाराचे प्रकरण असल्याने तेथून नगरच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान, सदरचे तरुण हे गवंडी काम करणारे परप्रांतीय असल्याचे समजते. हल्लेखोर तरुण हे स्वप्नील आग्रे याच्याकडे गवंडी काम करत होते आणि त्यांना आज स्वप्नील आग्रे याला मोठे पेमेंट मिळणार असल्याची माहिती मिळाली होती. ही रोकड लुटण्याच्या इराद्यानेच त्यांनी स्वप्नील याच्यावर गोळीबार केला असावा असा अंदाज आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पारनेरचे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप व सहकार्यांनी घटनास्थळ गाठले. हल्लेखारांकडून अधिकची माहिती घेतली जात आहे. दरम्यान, या घटनेने पारनेरसह मांडओहळ धरण परिसर हादरुन गेलाय.

शक्ती नारायण राय, नितीश गुड्डूु (दोघेही परप्रांतीय, हल्ली राहणार राजूरी, जिल्हा पुणे) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले असून अन्य दोघे जण पसार झाले आसल्याची माहिती मिळत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here