

जिल्हानिवड बुध्दिबळ स्पर्धेत जामखेडची रीया सुपेकर तृतीय
जामखेड प्रतिनिधी
जिल्हा निवड बुध्दिबळ स्पर्धेत जामखेडची रिया भागवत सुपेकर ही मुलींमध्ये जिल्ह्य़ात तृतीय तर जामखेड तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. रियाला प्रशिक्षक सागर गांधी व तिची आई प्रियंका सुपेकर यांचे मार्गदर्शन लाभले.


रविवार दि २५ सप्टेंबर २०२२ रोजी महाजन वाडी मंगल कार्यालय अहमदनगर येथे झालेल्या बुध्दिबळ निवड चाचणी स्पर्धेत संपूर्ण नगर जिल्ह्यातून ४५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. जामखेड येथिल रहिवासी व अनिशा ग्लोबल स्कूल आष्टी, इयत्ता पाचवी मधील रिया सुपेकर हिने या स्पर्धेत 3 गुण मिळवत जामखेड तालुक्यातून प्रथम तर अहमदनगर जिल्ह्यातून मुलींमध्ये तृतीय क्रमांक मिळवला.


यावेळी सत्कार करताना नगरचे सचिव श्री यशवंत बापट सर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. रियाला प्रशिक्षक सागर गांधी व तिची आई प्रियंका सुपेकर यांचे मार्गदर्शन लाभले. याअगोदर देखील रियाने ७ वर्षे वयोगटातील राज्यस्तरीय बुध्दिबळ स्पर्धा पनवेल येथे खेळत जामखेड व अहमदनगर चे नाव बुद्धिबळ खेळात उंचावले आहे.
जिल्हा निवड स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल रियाचा गांधी एस एस कोचिंग क्लासेस जामखेड च्या वतीने सत्कार करण्यात आला.






