आखेर खर्डा येथिल खैरी माध्यम प्रकल्प भरला शंभर टक्के

जामखेड प्रतिनिधी

खर्डा व परीसरातील गावांना पाणी पुरवठा करणारा खैरी माध्यम प्रकल्प या वर्षीच्या पावसाने आज दि २२ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास आखेर भरला आहे. त्यामुळे परीसरातील नागरीकांन सह शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. तर जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव ६५ टक्के भरला आहे.

या वर्षी जामखेड तालुक्यात मागिल तीन चार दिवसापुर्वीची पावसाची आकडेवारी पाहिली तर तालुक्यात एकुण ८४ टक्के पाऊस पडला आहे. पावसाळ्याच्या सुरवातीला जरी पावसाने हुलकावणी दिली आसली तरी परतीच्या पावसाने का होईना चांगला पाऊस झाला आसल्याने खर्डा व परीसरातील नागरीकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. तालुक्यातील सर्वात मोठा असणारा खैरी तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाणी वहात आहे. हे पाणी पुढे मराठवाड्यात झेपावले आहे.

खर्डा येथिल खैरी तलावात ५३३.६० द. ल. घ. फु. एवढा पाणीसाठा आसुन या मध्ये ४८५. २२ द. ल.घ.फु असा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या भागात सध्या २३१ मि. मि. पाऊस झाला आसल्याची नोंद झाली आहे. उपयुक्त टक्केवारी नुसार हा खैरी माध्यम प्रकल्प १०० टक्के भरला आहे.

दुसरीकडे जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव अजूनही पुर्ण क्षमतेने भरला नसला तरी ६५ टक्के पाणी उपलब्ध झाल्याने व पाण्याचा फ्लो सुरू असल्याने हा तलाव लवकरच भरेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापुर्वी हा तलाव सप्टेंबर महिन्यात पर्ण भरला नाही. असे कधी झाले नाही. मात्र यावर्षी आज दि. २० सप्टेंबर पर्यंत भुतवडा तलाव ६५ टक्केच भरला आहे. असे असले तरी तलावावरील भुरेवाडी व सौताडा तलावासह सर्व तलाव भरले असल्याने व पडणारे पावसाचे पाणी सांडव्यावरून थेट भुतवडा तलावाकडे येत आसल्याने लवकरात लवकर भुतवडा तलाव देखील भरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here