सावधान! जामखेड शहरातील व्हॉटसप चॅटिंग च्या माध्यमातून होऊ शकते आपली फसवणूक

जामखेड प्रतिनिधी

जामखेड मधील मोबाईल क्षेत्रातील व इतर काही व्यापाऱ्यांना एक तरुणी व्हॉटसप च्या माध्यमातून फोन कॉल व व्हॉटसप चाटींग करत मला मेडिकल साठी इमर्जन्सी पैसै लागत आहेत आसे भावनीक साद घालुन लोकांना गंडा घालण्याचा प्रकार सध्या जामखेड मध्ये अनुभवयास मिळत आहे. त्यामुळे मात्र या पासुन सावध रहाण्याचे आवाहन जामखेड तालुका मोबाईल अशोसीएशन चे अध्यक्ष सुनील जगताप यांना मोबाईल दुकानदारांसह व्यापाऱ्यांना केला आहे.

जामखेड शहरातील मोबाईल दुकानदारांसह काही व्यापाऱ्यांना एक अनोळखी व्हॉटसपवर चाटींग होत आहे. तसेच ती तरुणी आधी फोन कॉल देखील करत आहे. कॉल व चाटींग मध्ये ती तरुणी तीचे नाव सांगत आसुन फोनवरून मेडिकल इमर्जन्सीसाठी पैसे लागत आहेत असे सांगून भावनिक आवाहन करून ती तरुणी जामखेड शहरातील व्यापाऱ्यांना पैसे मागत आहे.

जामखेड शहरात आज रोजी सकाळ पासूनच , असे बरेच प्रकार झाले अशी चर्चा होत आहे, या बाबत मोबाईल असोसिएशन चे अध्यक्ष सुनील जगताप यांनी सांगितले की जामखेड मधील मोबाईल व्यापाऱ्यांना, खालील QR कोड वर पैसे पाठव असे सांगून व्हाट्सअप वर मॅसेज केलेले काही स्क्रिन शॉट्स आमच्याकडे आले आहेत, म्हणून मोबाईल असोसिएशन चे सुनील जगताप यांनी व्यापाऱ्यांना सावधानतेचे इशारा देत, शहानिशा केल्या शिवाय मदत करू नका असे आवाहन केले आहे.

सध्या सोशियल मिडियाच्या जगात भावनिक आवाहन करत आनेक भामटे लोक हजरो रु गोळा करुन लोकांना चुना लावत आहेत. पण ज्या गोष्टी ची कसलीही माहिती नाही न घेता अशा वेळी पैशाचा व्यवहार केला असता, आपण सायबर क्राईम च्या जाळ्यात अडकू शकतो म्हणून या पासून खबरदारी घ्यावी अशा आशयाचे आवाहन जामखेड तालुका मोबाईल अशोसीएशन कडून करण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here