विद्यार्थीनीचा विनयभंग, रोडरोमिओ विरोधात विनभंगाचा गुन्हा दाखल

जामखेड प्रतिनिधी : २२ सप्टेंबर

जामखेड शहरापासून जवळच आसलेल्या बीड रोडवरील मोहा हद्दीतील एक विद्यार्थीनी शाळेतून घरी पायी जात असताना मोटारसायकलवर आलेल्या एका रोडरोमिओने तीची छेडछाड करत विनयभंग केला. या प्रकरणी रोडरोमिओ विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत सविस्तर असे की, या घटनेतील पिडीत विद्यार्थीनी बीड रोडवरील मोहा परीसरातील शाळेतून बुधवार दि २१ सप्टेंबर रोजी दुपारी पायी घरी जात असताना एका हॉटेलच्या पुढे वडाच्या झाडा जवळ यातील आरोपी सचिन राजेंद्र बांगर रा. रेडेवाडी ता. जामखेड याने मोटारसायकलवर येवुन फिर्यादीचा डावा हात धरुन शेताकडे ओढुन, फिर्यादीचे तोंडात हाताने चापटाने मारुन, वगैरे फिर्यादी बाबत गैरवर्तन करुन पिडीतेचा विनयभंग केला. या प्रकरणी पिडीत मुलीने काल बुधवार दि २१ सप्टेंबर रोजी रात्री जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून वरील आरोपी विरोधात विनभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे करत आहेत. यावरून असे दिसते की, ग्रामीण भागातील मुली किंवा महिला अजूनही सुरक्षित फिरू शकत नाही. आरोपी सचिन राजेंद्र बांगर याचे विरूद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी पिडीचेच्या कुटुंबीयांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here