पाटोदा ब्रँच पोस्ट मास्तर म्हणून प्रियांका वाळुंजकर रुजू; पाटोद्याचे माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी केला सन्मान
जामखेड प्रतिनिधी
भारतीय डाक विभागात ब्रँच पोस्ट मास्तर म्हणून प्रियांका वाळुंजकर रुजू झाल्या आहेत .पोस्ट विभागाचे उपविभागीय अधिकारी अमित देशमुख यांच्या आदेशानुसार प्रियंका वाळुंजकर यांची पाटोद्यात नियुक्ती करण्यात आली आहे .
सध्या पोस्टात नवीन पदभरती सुरू आहे या भरती अंतर्गत वाळुंजकर यांची ब्रँच पोस्ट मास्तर म्हणून नियुक्ती झाली आहे .पाटोदा गरडाचे येथिल पोस्टात आज दि २१ रोजी त्यांनी ब्रँच पोस्ट मास्तर (BPM)म्हणून पदभार स्वीकारला .यावेळी पाटोदा गरडाचे माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी आदर्श पठाण ,शाहरुख पठाण, मच्छिंद्र लंघे ,सुखदेव शिकारे ,रमजान सय्यद ,उमेश मगर ,सिद्धीक शेख, दादा भाकरे ,दादा शिंदे ,अलफाईज शेख सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते .या कार्यक्रमाचे आभार राजगुरू यांनी मानले .