बापरे! आठ महीन्याच्या बाळाने गिळले नेलकटर, पुढे काय घडले वाचा सविस्तर

नाशिक : नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरात एक धक्कादायक घटना घडली. एका ८ महिन्याच्या मुलाने नेलकटर गिळले. नाशिक रोड परिसरता के. जी. मेहता येथे सोमवारी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणात जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार शक्य नसल्याने मेडिकल कॉलेजमध्ये बाळावर उपचार करण्यात आले.

नाशिकरोड येथील के. जे. मेहता शाळा परीसरात वास्तव्यास असलेल्या एका आठ महिन्याच्या मुलाने खेळता खेळता नेलकटर गिळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर पालकांनी त्वरित त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे उपचार शक्य नसल्याने आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार मेडीकल कॉलेजमधील डॉक्टरांनी मुलास कुठलीही शारीरिक इजा न होता दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर नेलकटर बाहेर काढले. ही घटना सोमवारी दुपारी घडली होती. सद्या मुलगा डॉक्टरांच्या देखरेखीत असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

नाशिकरोड परिसरातील के. जे. मेहता शाळेच्या परीसरात शिंदे कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांचा आठ महिन्याचा मुलगा आशिष हा सोमवारी दुपारी नेलकटर सोबत खेळत होता. खेळता खेळता त्याने हे नेलकटर गिळले. नीलकटर गिळल्याचे आईच्या लक्ष्यात येताच. त्यांनी घाबरलेल्या अवस्थेत मुलाला नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण तेथे उपचार करणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी त्यांना सांगितले. शिंदे कुटुंबाने तातडीने मुलाला आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ. वसंतराव पवार मेडीकल कॉलेजमध्ये दाखल केले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून येथील डॉक्टरांनी संध्याकाळी मुलावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉ. पॉल व त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली.

एवढ्या लहान मुलाने नेलकटर गिळल्याने त्याला शारीरिक इजा न होऊ देता शस्त्रक्रिया करणे हे आव्हानात्मक काम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आखेर लेझर दुर्बीणच्या सहाय्याने केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here