नान्नज येथे बॉम्ब ची आफवा पसरवणाऱ्या आरोपीच्या मंबई पोलीसांनी आवळल्या मुसक्या

जामखेड प्रतिनिधी

नान्नज या ठीकाणी सहा बॉम्ब ठेवले आहेत आशी माहिती मंबई येथील पोलीस कंट्रोलला दिल्याची आफवा पसरवणाऱ्या आरोपीच्या मुसक्या मुंबई पोलीसांनी आवळल्या आहेत. लवकरच त्याला जामखेड पोलीस ताब्यात घेणार आहेत.

जामखेड तालुक्यातील नान्नज येथे सहा बॉम्ब ठेवले आहेत व या मध्ये नान्नज मधिल एका मेडिकल वाल्याचा हात आहे. आशी माहिती देऊन आरोपी दिनेश सुतार याने पोलिसांची दिशाभूल करुन धावपळ उडवली होती. या दरम्यान तातडीने तपास यंत्रणांनी बॉम्बशोधक पथकासह नान्नज गाठले मात्र तपासाअंती ही अफवा असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

काल दिवसभर बॉम्बच्या चर्चेने नान्नज गाव पुर्ण भितीच्या दहशती खाली होते. ही अफवा दिनेश सुतार या व्यक्तीने पसवली होती. पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. आरोपी दिनेश सुतार याच्या वर दहा दिवसांपुर्वी जामखेड पोलीस स्टेशनला विनयभंगचा देखील गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक अजय साठे व काॅन्स्टेबल संदीप आजबे हे करत आहेत. याबाबत सुतार याचा जामखेड पोलीस शोध घेत होते मात्र तो वारवांर जागा बदलत आसल्याने त्यास अटक करण्यास वेळ लागत होता.

यानंतर एलटी मार्ग मुंबई पोलिसांनी दिनेश सुतार याच्या मुसक्या आवळुन त्याला अटक केली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यास ताब्यात घेण्यासाठी जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड चे पोलीस पथक जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. घटनेचा पुढील तपास जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here