जामखेड ते साबलखेड या राष्ट्रीय महामार्गाच्या खड्ड्यांबाबत या आमदारांनी अधिकाऱ्यांना खडसावले

जामखेड प्रतिनिधी

जामखेड नगर रोडवरील जामखेड ते चिंचपूर व आष्टी ते साबलखेड या राष्ट्रीय महामार्गाची आतीशय दुरावस्था झाली आहे. आनेकवेळा सांगुनही या रस्त्याचे काम सुरू झालेच नाही त्यामुळे आष्टी चे आमदार बाळासाहेब आजबे यांनी संबधित आधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे .

अहमदपूर ते अहमदनगर असा राष्ट्रीय महामार्ग आसलेल्या रोडवरील जामखेड ते चिंचपुर आणि आष्टी ते साबलखेड या उर्वरित रस्त्यासाठीची निविदा प्रसिद्ध होऊन अनेक दिवस झाले आहेत. पण अद्यापपर्यंत या निविदा का उघडल्या नाहीत असा सवाल करत साबलखेड ते जामखेड रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा नसता होणाऱ्या परिणामस सामोरे जाण्यास तयार रहा. जनतेला होणारा त्रास सहन केला जाणार नाही अशा शब्दांत राष्ट्रीय महामार्गचे मुख्य अभियंता व कार्यकारीअभियंता यांना जाब विचारत आ.बाळासाहेब आजबे यांनी खडे बोल सुनावले.

याबाबत आ.बाळासाहेब आजबे यांनी सांगितले की साबलखेड ते जामखेड या उर्वरित रस्त्याच्या निविदा भरून अनेक दिवस झाले परंतु अद्याप पर्यंत राजकीय दबापोटी अधिकाऱ्यांनी त्या निविदा उघडल्या नाहीत. त्यामुळे हे काम रखडले आहे. त्यासंबंधी आपण काल दि १६ रोजी राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा करून या निविदा तात्काळ ओपन करून वर्क ऑर्डर देऊन काम सुरू करावे आसे सांगितले.

तत्पूर्वी लगेच दोन दिवसाच्या आत महामार्गावर पडलेले खड्डे बुजून घ्यावेत जेणेकरून प्रवाशांना त्याचा त्रास होणार नाही, या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून प्रवास करणे जोखमीचे झाले आहे जनतेमध्ये याबाबत रोष निर्माण झाला आहे, प्रवाश्यांच्या होणाऱ्या नुकसानिस अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, आष्टी व जामखेड तालुक्यातील जनता या खड्डेमय प्रवासाला कंटाळले आहे, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ काम सुरू करण्याच्या सूचना द्या, नसता होणाऱ्या दुष्परिणामास सामोरे जाण्यास तयार राहा अशा खड्या शब्दात आमदार बाळासाहेब आजबे यांनी अधिकाऱ्यांची कान उघडनी केली आहे.

जामखेड पासून सौताडा या ठीकाणी देखील नीधी मंजूर होऊन अद्याप या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे जामखेड ते सौताडा रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दक्षिणेचे खासदार यांच्या सह कर्जत-जामखेड च्या दोन्ही आमदारांनी या बाबत लक्ष घालून तातडीने या राष्ट्रीय महामार्गाचे काम ताबडतोब सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी जामखेड येथिल नागरिकांन कडुन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here