जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील मोहरीसह जवळा, लोणी, गुरेवाडी, आशा एकुण चार गावांमध्ये लम्पी स्कीन आजाराची पॉझिटिव्ह जनावरे आढळून आली आहेत. सध्या २६ गावांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. यावरून जामखेड तालुक्यात लम्पी स्कीन डिसीज वेगाने पसरत आहे. अत्तापर्यंन्त १५ हजार जनावरांचे लसीकरण पुर्ण झाले आहे.
जामखेड तालुक्यात आत्तापर्यंत आठ गावांमधून लंपी स्कीन आजाराचे नमुने गोळा करून पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत. यामध्ये मोहरी, गवळवाडी, लोणी, जवळा, गुरेवाडी, पिंपळवाडी, बांधखडक, जमादारवाडी या गावांचा समावेश आहे. यापैकी मोहरीसह जवळा, लोणी, गुरेवाडी, आशा एकुण चार गावांमध्ये लम्पी स्कीन आजाराची पॉझिटिव्ह जनावरे आढळून आली आहेत.
तसेच तालुक्यात आत्तापर्यंत सात एपीसेंटर तयार करण्यात आली असून त्यामध्ये एकूण 26 गावांमध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे. या सर्व गावातील जनावरांची काळजी घेण्याबाबत पशुपालकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. ग्रामपंचायतच्या मदतीने संबंधित गावांमध्ये कीटकनाशकांची फवारणी करण्यात आलेले आहे.