भव्य दिव्य आकर्षक मिरवणुकीची परंपरा जपणाऱ्या शहरातील कोर्ट रोडवरील संघर्ष मित्र मंडळाची मिरवणूक यंदाच्या श्री विसर्जन मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरली. मंडळाची विसर्जन मिरवणूक अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने, शिस्तबद्ध निघते. आरतीनंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. मंडळाने डीजे व गुलाल फाटा देत टाळ मृदूंगाच्या गजरात सुमारे ५० बालवारकऱ्यासंह फेटे घातलेल्या महिला,लेझीम पथक लक्षवेधी ठरले तसेच करोना निर्बंधामुळे दोन वर्ष मिरवणूक काढता न आल्याने यंदा आगळीवेगळी व भव्य मिरवणूक काढण्याचा निर्णय मंडळाचे कार्यकर्त्यांनी घेतला होता.
बाप्पाला निरोप देण्यासाठी नागरिकांनी मिरवणूक मार्गावर प्रचंड गर्दी केली आहे. त्यामुळे सायंकाळ नंतर रस्ते गर्दीने वाहत होते.संध्याकाळी सहा नंतर शहरातील मोठी मंडळे मुख्य मिरवणूक मार्गावर मार्गस्थ झाल्यामुळे जल्लोषाला उधाण आले.कोरोनामुळे दोन वर्ष साध्या पद्धतीने उत्सव साजरा करणाऱ्या जामखेडकरांनी यंदा धुमधडाक्यामध्ये बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढली. अगदी सकाळपासूनच पारंपारिक वाद्यांचा गजर, गणरायाचा जयघोष आणि लेझीम खेळाची प्रात्यक्षिके अशा थाटात मिरवणूक निघाली. दरम्यान शहरातील शिस्तप्रिय व विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे नियोजन करून पारितोषिक मिळून नावलौकिक असलेल्या गत चाळीस वर्षाची परंपरा असलेल्या संघर्ष मित्र मंडळ दरवर्षी विधायक उपक्रम राबविण्यात तालुक्यात आघाडीवर आहे.
मंडळाच्या वतीने दि 07 रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तसेच विसर्जनाच्या दिवशीही महाप्रसाद वाटप करण्यात आला मंडळांने सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत मंडळातील मुले मुली महिला व पुरुष यांचा सहभाग असतो सर्वांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाची नियोजन करून डीजे व गुलाल फाटा देत राजुरी व पाडळी येथील वारकऱ्यांसह लहान मुलांचे लेझीम पथक पारंपारिक पद्धतीने फेटे बांधून महिलावर्ग तसेच पारंपरिक पोशाखात पुरुषवर्गा मिरवणुकीचे आकर्षण ठरले या मिरवणुकीने शहराचे लक्ष वेधले होते तसेच दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले होते.
त्याचप्रमाणे महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले होते पूजाअर्चा, परंपरांमध्ये कायम पुरुष अग्रणी आणि स्त्री मागे, असे चित्र वर्षानुवर्षे पहायला मिळत असताना, मंडळाने महिलांच्या हस्ते गणपतीची आरती करून त्यांना सन्मान देण्याची भुमिका घेतल्याने संघर्ष मित्र मंडळाचे कौतुक झाले होते यावेळी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते गणरायाची आरती करून विसर्जन करण्यात आले.