जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील जांबवाडी येथील चौतीस वर्षीय युवक संतोष नामदेव सागडे, वय ३४ वर्षे, हा गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. जांबवाडी येथुन त्याच्या घरापासून अज्ञात व्यक्तींनी त्याला मोटारसायकलवर बसुन घेऊन गेले तो परत आलाच नाही त्यामुळे संतोष चे कुटुंबीय सध्या चिंतेत आहे. संतोष यांचे अपहरण झाले आसल्याचा संशय व्यक्त केला आहे.

जांबवाडी येथील संतोष नामदेव सागडे आसे या युवकाचे नाव आहे तो गुरुवार दि. ८ सप्टेंबर २०२२ पासुन बेपत्ता झालेला आहे गुरुवारी सकाळी जांबवाडी येथील किरणा दुकानासमोर बसलेला होता. या वेळी एक अज्ञात युवक मोटारसायकलवर आला व संतोष यास मोटारसायकल बसुन घेऊन गेला. ज्या व्यक्तीच्या गाडीवर बसुन संतोष बेपत्ता झाला आहे अद्याप त्या व्यक्तीची देखील ओळख पटलेली नाही. संतोष याच्या अंगावर भगव्या रंगाचा टी शर्ट व काळ्या रंगाची नाईट पाॅन्ट घातलेली आहे. त्याच्याजवळील मोबाईल फोन व इतर वस्तू ही घरीच आहेत संतोषच्या घरच्या मंडळीनी सर्व नातेवाईकांकडे शोध घेतला आहे परंतु तो सापडत नसल्याने त्याचे बंधु नवनाथ सागडे यांनी जामखेड पोलीस स्टेशनला मिसींगची तक्रार दाखल केली आहे. मोटारसायकल बसवुन संतोषला अज्ञात व्यक्तीने नेले आहे त्यामुळे त्याचे अपहरण झाले आसल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. पुढील शोध पोलीस घेत आहेत.

संतोषच्या आचानक बेपत्ता होण्याने कंटुंबात घबराटीचे वातावरण आहे. जामखेड पोलीसांनी लवकरात लवकर शोध घ्यावा अशी विनंती संतोषच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here