जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील धानोरा वंजारवाडी या ग्रृप ग्रामपंचायतीला गेल्या एक महिन्यापासून ग्रामसेवक उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.तरी या बाबत दखल न घेतल्यास वंजारवाडी चे गणेश विठ्ठल ओंबासे यांच्या सह ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे .

या प्रकरणी गटविकास अधिकारी यांना वंजारवाडी चे गणेश विठ्ठल ओंबासे यांच्या सह ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,धानोरा-वंजारवाडी या ग्रामपंचायतीला गेल्या एक महिन्यापासून ग्रामस्थ उपलब्ध नाही .सर्व सामान्यांचे घरकुल आसेल , मृत्यू प्रमाणात आसेल ,पिण्याचे पाणी व गावातील विजेच्या बल्ब चा प्रॉब्लेम आसेल तर ग्रामसेवक येत नसल्याने विनाकारण ग्रामपंचायतीकडे चकरा माराव्या लागतात त्यावेळी ग्रामपंचायत बंद आसते. जुने ग्रामसेवक व्यवस्थित माहिती देत नाहीत आणि नवीन कोण पदभार घेत नाही .त्यामुळे अशात दाद कोणाकडे मागायची ?

गेल्या अडीच वर्षांत एकही ग्रामसभा झाली नाही. सध्या ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. बाकीच्या कामांची बीले निघतात मग गरीबांची कामे का होत नाहीत ? त्यामुळे या गोष्टीकडे गटविकास अधिकारी यांनी लक्ष घालावे अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन व बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल आसा इशारा गणेश विठ्ठल ओंबासे यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे .

या निवेदनावर गणेश विठ्ठल ओंबासे , भागवत दिगंबर जायभाय ,मनोज तुळशीराम जायभाय, विठ्ठल तुकाराम जायभाय ,विजय विकास जायभाय, केशव नवनाथ गोल्हार व बाळु प्रल्हाद जायभाय यांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here