जामखेड प्रतिनिधी
शिवराणा प्रतिष्ठान जामखेड च्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शिवराणा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे मंडळाचे सर्व स्तरातून कैतुक होत आहे.
गेल्या आनेक वर्षापासून शिवराणा प्रतिष्ठान जामखेड हे मंडळ विविध सामाजिक उपक्रमात सहभागी आसते.गेल्या आनेक वर्षापासून हे मंडळ गणपतीची स्थापना करत आसते.या वर्षी मंडळाने गेली आठ दिवस विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. या मध्ये डोंबारी खेळ,देवाचे भजन कीर्तन कार्यक्रम ,लिंबू चमचा स्पर्धा, दहीहंडी, डान्स स्पर्धा, संगीत खुर्ची, सह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रम महीलांसह लहान मुलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक पोपट (नाना)राळेभात ,नगरसेवक अमित चिंतामणी ,व माजी सरपंच बाळासाहेब राळेभात यांच्या सह आनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवराणा प्रतिष्ठान अध्यक्ष शुभम विजय साळुंके, उपाध्यक्ष विकास कचरू साळुंके, अशोक साळुंके, विशाल पवार ,अमोल साळुंके ,राहुल साळुंके ,नितीन साळुंके ,आकाश साळुंके ,विकी साळुंके ,दिनेश साळुंके, योगेश साळुंके ,आकाश पवार ,प्रितीम पवार ,दिनेश साळुंके ,दिनेश पवार ,राम पवार, सनी पवार ,शुभम पवार ,बिटु मोरे ,ओंकार मोरे ,यांनी परीश्रम घेतले.
शिवराणा प्रतिष्ठान च्या वतीने दि ८ रोजी वाजत गाजत गणरायाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. या वेळी मोठी आकर्षक गणरायाच्या पाठीमागे सजावट केली होती. ढोल ताशा व डीजे च्या तालात रात्री उशिरा गणरायाच्या मुर्तीचे विसर्जन करुन गणरायाला निरोप देण्यात आला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here