साई गणेश मंडळातर्फे गुणवंतांचा केला सन्मान
जामखेड प्रतिनिधी
साई नगर येथील साई गणेश तरूण मंडळाने गणेशोत्सवानिमित्त गुणवंताचा सन्मान मंगळवारी सायंकाळी करण्यात आला यावेळी आदर्श शिक्षका अनिता पवार (पिंपरे), एनएमएमएस ज्ञानेश्वरी भोगील, वेद भिलारे, अर्थव काथवटे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष अर्चना राळेभात, पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, नविन मराठी शाळेच्या मुख्याध्यापक मीना राळेभात, नगरसेवक दिगंबर चव्हाण, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, ज्येष्ठ सदस्य दत्तात्रय राऊत, सत्तार शेख, अशोक वीर, अविनाश बोधले, पप्पू सय्यद, धनराज पवार, अजय अवसरे, राजेश भोगील,आंधळे मेजर, माळवे मेजर,अंकुश तात्या,काकडे सर,डोके सर, देविदास कडभने,भोंडवे सर,माने साहेब, हजारे सर, खेत्रे साहेब, जाधव साहेब, त्रिंबक लोळगे, नागरगोजे साहेब, गायकवाड साहेब,कदम सर,अविनाश कडू,संतोष जायभाय, केळकर सर,कसबे सर, आव्हाड सर, सुपेकर साहेब, जगदाळे साहेब, सुळे साहेब यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पवार मॅडम म्हणाल्या की, सध्या अनेक गणेश मंडळातर्फे डिजेचा कर्णकर्कश आवाज करतात पण साई गणेश मंडळातर्फे अंत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. यावेळी बोलताना मुख्याध्यापीका मीना राळेभात म्हणाल्या की, साई गणेश मंडळातील बालकांना त्यांचे आईवडील पाठिंबा देतात हा खूपच स्तुत्य उपक्रम आहे. त्याच्या पांठिब्यामुळे बालकांवर लहान वयात सामाजिक हेतु रूजला जात आहे.
यावेळी दत्तात्रय राऊत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. गेल्या सहा वर्षापासून साई गणेश मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात हे सहावे वर्ष आहे. गुणवंताचा सन्मान तसेच सर्वाना महाप्रसादाची व्यवस्था मंडळाकडुन करण्यात आलि होती.