जामखेड प्रतिनिधी

सालाबादप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने महासंग्राम युवा मंचच्या वतीने जामखेड शहरातील आंबेडकर सर्कल या ठीकाणी भव्य आसे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या वेळी तालुक्यातील आनेक युवकांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले.या वर्षीचे रक्तदान शिबीराचे ९ वे वर्ष आसल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक महेश निमोणकर यांनी दिली.

या रक्तदान शिबिरात एकुण ७१ जणांनी रक्तदान केले. सकाळी आकरा वाजता या रक्तदान शिबिराचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर राळेभात, माजी सभापती डॉ भगवानराव मुरुमकर, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे तालुका प्रमुख पांडुराजे भोसले, सुंदरदास बिरंगळ साहेब, महावितरण कंपनीचे शाखा अभियंता नंदकुमार बेद्रे, राहुल उगले, देविदास भादलकर, मंडळाचे अध्यक्ष महेश निमोणकर, अॅड अमोल जगताप, आप्पासाहेब देवकाते, अजय गैड, विजय गैड सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मानवाला रक्ताची कमतरता भासली की दुसर्‍या व्यक्तीच्या रक्ताची गरज आसते कारण रक्ताची निर्मिती करता येत नाही ते लोकांनकडुच घ्यावे लागते. महासंग्राम युवा मंचने आयोजित केलेल्या रक्ताची नक्की गरजवंताला मदत होईल आसे मत प्रा मधुकर राळेभात यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते. तसेच स्‍पर्धेच्‍या व धकाधकीच्‍या युगात दिवसेंदिवस वाढणारे अपघात व इतर आजार यामुळे रक्‍त आणि रक्‍तघटक ही आरोग्‍य सेवेतील आवश्‍यक उपचार प्रणाली झालेली आहे. काहीही अपेक्षा न करता दिलेले रक्‍तदान हे जीवनदान आहे आसे मत मंडळाचे अध्यक्ष महेश निमोणकर यांनि व्यक्त केले.

या वेळी जिल्हा रुग्णालयात अहमदनगर व जिल्हा रुग्णालयाचे डॉ खान मॅडम, डॉ शिंदे, व डॉ गर्जे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महासंग्राम युवा मंच नेहमीच सामाजिक क्षेत्रात कार्यरत आसते दुष्काळात मोफत टँकरने पाणी वाटप केले होते. तसेच कोरोना काळातही गरजुंना कीराना व जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले आहे.

या शिबिरा दरम्यान महासंग्राम युवा मंचाचे रामदास निमोणकर, अतुल जगताप, गणेश वराट मनोज वराट, सोमा राऊत, निलेश बिराजदार, सागर हुलगुंडे, अक्षय म्हेत्रे, दादा (मेजर) निमोणकर, जितेंद्र जाधव भय्या बांदल, सह आनेक कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here