जामखेड प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खर्डा येथे आज दि ५ सप्टेंबर रोजी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली ,या कार्यक्रमासाठी शिक्षक दिनानिमित्त डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.

या प्रसंगी खर्डा गावचे सरपंच श्री आसाराम गोपाळघरे, ग्रा प सदस्या सौ संजीवनी वैजीनाथ पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री शशिकांत गुरसाळी, श्री वैजीनाथ पाटील, ग्रा प सदस्य श्री गणेश शिंदे, पत्रकार मा.दत्तराज पवार,मा.अनिल धोत्रे,खर्डा मुले शाळेचे मुख्याध्यापक राम निकम सर,मुली शाळेचे मुख्याध्यापक श्री बाबुराव गीते सर,उर्दू शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती समिना सय्यद मॅडम आणि शिक्षक जानकीराम खामगळ, दिनकर मोहळकर ,चंद्रकांत अरण्ये , संतोष वहील, श्रीहरी साबळे ,निसार सय्यद सर, अमोल घाटूळे ,ज्योती रासकर , ज्योती ढवळशंख , सुवर्णा माणेकर मॅडम,रत्नप्रभा शिरसाठ मॅडम यासह मान्यवर उपस्थित होते.

तीनही शाळेतील सर्व शिक्षकांचा आजच्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून खर्डा गावचे सरपंच मा.श्री आसाराम गोपाळघरे ग्रामपंचायत सदस्य सौ संजीवनी वैजीनाथ पाटील ,श्री वैजीनाथ पाटील,ग्रा प सदस्य गणेश शिंदे,ग्रा.प.सदस्य राजू मोरे,संतोष काळे,रज्जाक तांबोळी, यांनी सर्व शिक्षकांचा शाल ,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तसेच शाळेतील मुलांनी शिक्षक दिनानिमित्त स्वतः बनवलेले भेटकार्ड शिक्षकांना देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

उत्कृष्ट भेटकार्ड बनवणाऱ्या मुलांना वही,पेन व चॉकलेट बक्षीस म्हणून मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. ग्रा.प. सदस्य मा.वैजीनाथ पाटील यांनी मिशन आपुलकी अंतर्गत 5100 रु देणगी दिली.मा सरपंच आसाराम गोपाळघरे यांनी शाळेसाठी उत्तम दर्जाचे RO वॉटर फिल्टर देण्याचे जाहीर केले.

मिशन आपुलकी अंतर्गत सर्व नागरिकांनी शाळेस सर्वोतोपरी आर्थिक मदत करावी असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती व शाळेच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here