जामखेड प्रतिनिधी



जिल्ह्य़ात सध्या काही भागात जनावरांमध्ये अढळणाऱ्या लंपी स्कीन व्हॉयरस या आजाराची लक्षणे आसणारी जनावरे आढळून येत आहेत. त्यातच जामखेड तालुक्यात देखील लंपी स्कीन या आजाराने एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आसुन आपल्या जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन जामखेड पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.


जामखेड तालुक्यातील मोहरी येथील एका शेतकऱ्याच्या दोन गायींचे व इतर एका आशा तीन जनावरांचे सॉम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या मध्ये मोहरी येथील एका गायीचा रीपोर्ट लंपी स्कीनचा पॉझिटिव्ह आला आसुन तीला लंपी स्कीन आजार झाला आसल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समितीचे डॉ संजय राठोड यांनी रोखठोक न्यूज शी बोलताना दिली.

लंपी स्कीन आजार हा जनावरांना होतो. मात्र हा आजार संसर्गजन्य आहे. जणावरांच्या गोठ्यातील माशा, डासांनमार्फत हा आजार पसरण्याची जास्त भीती आहे. याची लक्षणे म्हणजे जनावरांच्या अंगावर गाठी व ताप येतो, हा आजार विषाणुजन्य आजार आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकर्यांनी घाबरून न जाता आपल्या जणांवरांची योग्य ती काळजी घ्यावी तसेच आपला परीसर स्वच्छ ठेवावा ज्या जनावरांना आजाराची लागन झाली आहेत त्यांनी इतर जनावरांना बाजुला ठेवावे. ज्या भागात लंपी स्कीन आजाराची जनावरे आढळून आली आहेत त्या भागातील पाच कीमी अंतरावरील सर्व भागतील जणावरांचे लसीकरण करुन घेणे महत्त्वाचे आहे.

जामखेड पंचायत समितीच्या पशुधन विभागाचे पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती चे डॉ संजय राठोड, पशुधन विकास अधिकारी खर्डा येथिल डॉ कुलदीप चौरै, शामराव सुरवसे, गजेंद्र खेत्रे, दत्तात्रय धारकर, वसंत अखाडे, सौ. मंजुशा म्हेत्रे मॅडम, श्री मंदिलकर व संदीप आटोळे यांच्या पथकाने जामखेड तालुक्यातील वेगवेगळ्या भागात लसीकरण सुरु केले आहे. अत्तापर्यंन्त पाज हजार जनावरांचे लसीकरण झाले आसल्याची माहिती पशुधन विभाकडुन मिळाली आहे.

ग्रामपंचायत स्तरावर लंपी आजार टाळण्यासाठी व त्यापासुन बचाव करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर औषध फवारणी सुरू केली आहे. प्रत्येक गावात पथक तयार करण्यात आले आहेत. अत्तापर्यंन्त पाच हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच ज्या जनावरांचे लसीकरण झाले नाही आशा शेतकर्यांनी पंचायत समितीच्या पशुधन विभागाकडे संपर्क साधुन शंभर टक्के लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले आहे.






