जामखेड प्रतिनिधी  

तालुक्यातील पिंपरखेड हसनाबाद ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी आमदार प्रा राम शिंदे यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र ओमासे यांच्या पत्नी सौ उषा राजेंद्र ओमासे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे  यावेळी नवनिर्वाचित सरपंच सौ उषा राजेंद्र ओमासे म्हणाल्या की आज माझ्या सारख्या अत्यंत गरीब कुटुंबातील एक महिलेला पिंपरखेड व हसनाबाद या मोठ्या गावच्या सरपंच पदी निवड करुन जे काही सर्वच्या सहकार्यनी सरपंच झाले आहे आणि सदस्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याता तडा जाऊ देणार नाही आणि गावाच्या विकासासाठी आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खा सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा विकास कामाच्या माध्यमातून गावचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 

आकरा सदस्य आसलेल्या पिंपरखेड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी पुर्वी बापुराव ढवळे यांच्या पत्नी सौ ढवळे मॅडम सरपंच होत्या .त्यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यानंतर दिड वर्षांनंतर पिंपरखेड हसानाबादच्या सरपंच पदी सौ उषा राजेंद्र ओमासे यांची बिनविरोध निवड झाली. निवडी दरम्यान अकरा सदस्यांपैकी माजी सरपंच बापुसाहेब ढवळे, नवनिर्वाचित सरपंच सौ. उषा राजेंद्र ओमासे, अविनाश गायकवाड, आंबर लबडे, बाळासाहेब कारंडे, सुर्यकांत कदम, प्रविण भापकर, इसहाक सय्यद आसे आठ सदस्य उपस्थित होते. तर उर्वरित तीन सदस्य गैरहजर होते.

सरपंच सौ उषा राजेंद्र ओमासे यांच्या निवडीनंतर गावात फटाके फोडून जल्लोषात स्वागत करण्यात आले या नंतर सकाळी बुडनशहावली दर्गा याठिकाणी सरपंच व सदस्यांनी दर्शन घेतले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांन समोर आपले मनोगत व्यक्त करताना सरपंचाचे पती राजेंद्र ओमासे म्हणाले की विरोधक माणसे फोडण्याचे काम करतात मात्र माणसे फोडुन कामे होत नसतात तर माणसे जोडुन कामे होतात. माझी पत्नी सरपंच होण्यासाठी ८० टक्के लोकांची इच्छा होती. दोन चार राजकीय कुटुंबातील लोकांनीच फक्त विरोध केला होता. आमचे नेते माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या सुचने नुसार ही निवडणूक पार पडली मार्गदर्शक बापुराव ढवळे यांनी राजीनामा देऊन मनाचा मोठेपणा दाखवला हे आम्ही कधी विसरणार नाहीत. गावची जबाबदारी आमच्यावर टाकली त्याला निस्वार्थीपणे सेवा करुन गावाला पुढे घेऊन जायचे काम करायचे आहे आसे राजेंद्र ओमासे म्हणाले. 

या वेळी भागुजी कदम, मगबुल शेख,बादशाह सय्यद, भारत ढवळे, पृथ्वीराज भोसले, दत्तात्रय आधुरे, नजिरभाई सय्यद, फय्याज शेख, भगवान ओमासे, श्रीराम ओमासे, अशोक कदम, मारुती कदम, संतोष भापकर, डॉ. अभयकुमार गुंजाळ, डॉ. प्रकाश कारंडे, राहुल पवार, राहुल चोरगे सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here