एक्स्प्रेस वे बांधण्यासाठी पंजाबचा एक शेतकरी त्याचे दोन मजली घर सध्याच्या ठिकाणापासून ५०० फूट दूर हलवत आहे. दिल्ली-अमृतसर- जम्मू – कटरा एक्स्प्रेस वेच्या मार्गात संगरूरमधील रोशनवला गावात त्याच्या शेतात बांधलेल घर मध्ये आल्यानंतर सुखविंदर सिंग सुखी हा शेतकरी आपले घर हलवत आहे.

घर हे घर कारण तेच ठीकाण आहे तिथे माणसाला सुख आणि शांती मिळते. पंजाब चे शेतकरी सुखविंदर सिंग यांनीही याचे उदाहरण दिले आहे. खरं तर त्यांच घर दिल्ली-अमृतसर-जम्मु कटरा एक्स्प्रेस वेच्या वाटेत येत होतं. त्यामुळे त्यांनी रचनातलं घर हलवण्याचा विचार केला. आणि आशी कल्पना आली की एकुण तुम्ही थक्क व्हाल.

सुखी यांना पंजाब सरकारने घर पाडून टाकण्यासाठी नुकसान भरपाईची ऑफर दिली होती परंतु त्यांनी नकार दिला. त्यानंतर त्यांनी संपूर्ण घर पाडण्याऐवजी दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतला.महामार्गासाठी भूसंपादन करण्यात आले तेव्हा पंजाब सरकारने सुखी यांना घराबद्दल नुकसानभरपाई देऊ केली होती. तथापि, भरपाई घेऊन पुन्हा नवे घर बांधण्याऐवजी सुखी यांनी आहे ते घरच रस्त्याच्या जागेवरून बाजूला सरकवून घेण्याचा निर्णय घेतला. महामार्गाला वाट मोकळी करून देण्यासाठी सुखी यांना आपले घर मूळ जागेवरून ५०० फूट अंतरावर सरकवून घ्यावे लागणार आहे.

“दिल्ली-अमृतसर-कटरा एक्स्प्रेस वेच्या मार्गात येत असल्याने मी ते घर स्थलांतरित करत आहे. मला भरपाईची ऑफर देण्यात आली होती, परंतु मला दुसरे घर बांधायचे नव्हते. ते बांधण्यासाठी मी सुमारे दीड कोटी रुपये खर्च केले आहेत. आत्ता ते 250 फूट पुढे सरकले आहे,” अशी माहिती सुखविंदर सिंग सुखी यांनी एएनआयला बोलताना दिली आहे. प्रवाशांचा प्रवास वेळ कमी करण्याच्या उद्देशाने केंद्राच्या भारतमाला प्रकल्पांतर्गत एक्सप्रेस वे बांधला जात आहे. पूर्ण झाल्यानंतर एक्सप्रेस वे हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधून जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार हे घर हलवण्यासाठी 40 लाख रुपये खर्च झाले आसुन कारागिरांनी दोन महीन्यात या देशी जुगाडा पासून 250 फूट अत्तापर्यंन्त हे घर स्थलांतरित केले आहे तर आनखी 250 फुट हे घर स्थलांतरित करण्याचे बाकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here