जामखेड प्रतिनिधी
बीड जिल्ह्य़ातील पाटोदा तालुक्यातील, हनुमानगड येथील मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे यांच्या विरोधात लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप झाल्याने त्यांच्यावर जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामखेड तालुक्यातील मोहरी येथील संबंधित महिलेने खर्डा पोलीस स्टेशनला फीर्याद दाखल झाल्याने खाडे महाराजांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुवासाहेब जिजाबा खाडे रा. सावरगाव घाट हनुमान गड, ता. पाटोदा जि.बीड याने जून ते २०२२ ते दिनांक १२ जुलै रोजी रात्री च्या सुमारास फिर्यादी महिला यांना सोन्याच्या दागिन्याचे तसेच लग्न करण्याचे आमिष दाखवून फिर्यादी महिलेच्या संमतीशिवाय यातील बुवासाहेब जिजाबा खाडे याने वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले.
त्यामुळे महीलेच्या फिर्यादीवरून आरोपी हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे विरोधात दि. ४ आॅगस्ट २०२२ रोजी रात्री हा खर्डा पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास खर्डा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील हे करत आहेत. या घटनेत दोन्ही बाजुने परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाल्याने जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.