जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील तेलंगशी येथील रहिवासी परंतु संपुर्ण तालुका व जिल्ह्यात एक धाडसी, कणखर व संघर्षशिल नेतृत्त्व माजी जि. प. सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, तेलंगशीचे माजी सरपंच सुभाष (आप्पा) जायभाय यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य कै. सुभाष आप्पा जायभाय हे तेलंगशी गावचे ३५ वर्षे सरपंच होते. काही वर्षांन पुर्वी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी देखील उभे राहिले होते या वेळी ते दोन मतांनी विजयी झाले होते. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. तसेच खरेदी विक्री संघ अहमदनगर संचालक पदावर कार्यरत होते. तेलंगशी येथिल विविध कार्यकारी सेवा विकास सेवा सोसायटी संचालक म्हणून काम पाहिले आहे. सध्या नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद आरक्षणाच्या आनुशंगाने ते जिल्हा परिषद साकत गटातुन भाजप कडुन इच्छुक होते. दोन दिवसांपूर्वीच कै. विष्णू वस्ताद काशीद प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत देखील त्यांनी हजेरी लावली होती.
आप्पांच्या निधनाने जामखेड तालुक्यात निर्माण होणारी राजकीय पोकळी भरून न निघणारी आहे. जामखेड तालुक्यातील सर्व स्तरातून आप्पांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.