जामखेड प्रतिनिधी

शहरातील सदाफुले वस्तीवर अज्ञात चोरटय़ांनी डॉ संदिप बेलेकर यांच्या वडीलांना मारहाण करून घरातील एकुण ४ लाख ३२ हजार रुपयांचा सोन्या चांदीचा एवज लंपास केला. मागील महीन्यांपासून चोर्‍यांचे सत्र थांबेना पोलीस प्रशासनाकडु मात्र दखल घेतली जात नसुन या चोरटय़ांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांन कडुन होत आहे.

शहरात एक महीन्यांपासून चोरटय़ांचा धुमाकूळ सुरूच आसुन अजुन पोलीसांना चोरटय़ांचा थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस दिवस चोरट्यांची दहशत शहरात सुरुच आहे. शहरातील सदाफुले वस्ती येथे दि ६ रोजी संदिप जगन्नाथ बेलेकर हे आपल्या मुलांसमवेत वरील मजल्यावर झोपले होते. तर त्यांचे वडील हे खालील खोलीत झोपले होते. याच दरम्यान रात्री दिड वाजण्याच्या सुमारास तीन चोरटय़ांनी घराच्या पाठीमागील बाजुने आत प्रवेश केला. व फीर्यादी डॉ संदिप बेलेकर झोपलेले आसलेल्या खोलीची कडी बाहेरुन लावली. यावेळी खालच्या खोलीतील बेडरूमचा दरवाजा लावलेला नव्हता त्यामुळे चोरट्यांनी रुम मध्ये प्रवेश केला व कपाटातील उचकापाचक करत आसताना वडीलांना जाग आली तेंव्हा एका चोरटय़ांने हातातील लाकडी दांडक्याने वडील जगन्नाथ बेलेकर यांच्या डोक्यात मारहाण करून जखमी केले व कपाटातील १ लाख रुपये रोख सह एकुण ४ लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. डॉ फीर्यादी संदिप बेलेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन अज्ञात चोरटय़ांन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here