प्रतिनिधी । जामखेड
गेल्या आनेक महीन्यांपासून जामखेड बीड रस्त्याची दुरवस्था झाली आहे.येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या अथक पाठपुराव्यानंतर जामखेड – बीड या राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास प्रारंभ झाला आहे.
जामखेड शहरातून जाणा-या नगर – बीड राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केली होती.यासाठी त्यांनी सबंधीत राष्ट्रीय महामार्ग च्या अहमदनगर व बीड कार्यालयाशी सातत्याने पाठपुरावा केला होता. जामखेड ते नगर व जामखेड ते बीड या मार्गाला राष्ट्रीय मार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर या रस्त्याचे रूंदीकरण व दर्जेदार डांबरीकरण होईल ही आशा जामखेडकरांना होती. मात्र आज असा दर्जा मिळुनही या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. जागोजागी जीवघेणे खड्डे पडल्याने या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय दर्जा प्राप्त झाल्यानंतरही सदर रस्त्याच्या दुरूस्तीकडेही सबंधीत विभागाचे दुर्लक्ष झाले होते. गेल्या एक वर्षापासून याबाबत वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.परिणामी सध्या वाहनचालकांना जीव मुठीत धरूण प्रवास करावा लागत आहे.
जामखेड हे मराठवाड्याचे प्रवेशव्दार असल्याने याठिकाणाहून वाहनांची सर्वाधिक दळणवळण असते.त्यातच पावसामुळे या मार्गावरील खड्डे वाढून ते आता एक ते दोन फुटापर्यंत खोल झाले होते. अशा खड्ड्यांमुळे वेगाने जाणा-या मोटारसायकल याठिकाणी पडून अनेक मोटारसायकलस्वार गंभीर जखमी तर काही जीवानिशी गेले होते.मोठ्या वाहनांचेही अपघाताचे प्रमाण दिवंसेदिवस वाढत होते.याकडे संबधित राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे लक्ष वेधण्याचे काम कोठारी यांनी केले. ही बाब गांभीर्याने घेवुन जामखेड – बीड मार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी कोठारी यांनी केली होती.
याबाबत कोठारी हे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अहमदनगर उपविभागीय कार्यालयाचे उपअभियंता श्री दिलीप तारडे व याच विभागाचे बीड उपविभागीय कार्यालयाचे उपअभियंता श्री भोपळे यांच्याशी संपर्कात होते. याप्रश्री तातडीने दखल घेवुन जामखेड – बीड महामार्ग रस्त्यावरील खड्डे बुजवाण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे.



