जामखेड प्रतिनिधी : १३ जून

जामखेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२२ साठी आरक्षण जाहीर झाले असून कर्जत उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी आरक्षण जाहीर केले असून आगामी नगरपरिषदेची निवडणूक या आधारे लढवली जाईल. सद्या तरी अशीच शक्यता आहे. हे सर्व आरक्षण नव्यानेच जाहीर झाले असून मागील निवडणुकीतील आरक्षणाचा कोणताही संदर्भ घेण्यात आलेला नाही.
आज दि. १३ रोजी सकाळी ११.०० वाजता जामखेड तहसील कार्यालयासमोरच्या प्रांगणात हा आरक्षण जाहीर करण्याचा कार्यक्रम पार पाडला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा.मधुकर राळेभात, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, माजी नगरसेवक मोहन पवार, दिगांबर चव्हाण, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अमोल गिरमे, ईस्माईल सय्यद, वसिम सय्यद (मंडपवाले), महेश राळेभात, विजय कोठारी, अमित जाधव, प्रमोद पोकळे, जाकीर सय्यद, गणेश राळेभात, उमर कुरेशी आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी जाहीर करण्यात आलेले

प्रभाग निहाय आरक्षण.

प्रभाग क्रमांक १ अ सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक १ ब, सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक २ अ सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक २ ब,सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ३ अ सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक ३ ब,सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ४ अ सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक ४ ब, सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ५ अ अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ५ ब,सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ६ अ अनुसूचित जाती महिला प्रभाग क्रमांक ६ ब, सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ७ अ सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक ७ ब, सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ८ अ अनुसूचित जमाती सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ८ ब सर्वसाधारण महिला,

प्रभाग क्रमांक ९ अ सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक ९ ब, सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १० अ सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक १० ब,सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ११ अ सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक ११ ब,सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १२ अ अनुसूचित जाती महिला प्रभाग क्रमांक १२ ब, सर्वसाधारण

जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी एकुण १२ प्रभाग असून प्रत्येक प्रभातून दोन नगरसेवक निवडून येणार आहेत. मागील निवडणुकीत पेक्षा या निवडणूकीत जागा वाढून २४ झाल्याने अनुसूचित जाती एक वाढीव जागा तर अनुसूचित जातीसाठी एका जागेचे आरक्षण पडल्याने त्यांना प्रथमच प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. हि सर्व आरक्षण प्रकिया चिठ्ठी काढून व आॅन कॅमेरा झाली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here