
जामखेड प्रतिनिधी
बालरुग्णांना चांगली सेवा देणारे दत्त बालरुग्नालय हे अत्यंत चांगल्या पद्धतीचे रुग्णालय बनवले आहे. गेल्या साडेतीन वर्षांत सहा हजार मुलांवर चांगले उपचार केले. तसेच कमी वजनाच्या मुलांवर देखील उपचार केले, डॉक्टरांची सेवा चांगली आसली की रुग्ण वाढतात असे मत आ. रोहित पवार यांनी दत्त बालरुग्नालयाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

गेल्या साडेतीन वर्षांपासून सेवेत सेवेत आसलेल्या दत्त बालरुग्नालयाचे स्थलांतर व उद्घाटन सोहळा कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते सोमवार दि ५ रोजी सायंकाळी संपन्न झाला. या वेळी दत्त बालरुग्नालयाचे संचालक डॉ मनोज शिंदे, डॉ विकास शिंदे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, राजेंद्र कोठारी, मंगेश आजबे, महेश निमोणकर, बापूसाहेब कार्ले, चेअरमन कीसनराव ढवळे, रत्नदीप मेडिकल फौंडेशन चे संचालक डॉ भास्कर मोरे, माजी कृषी अधिकारी सुंदरदास बिरंगळ, दत्त एजन्सी चे मालक अमोल बिरंगळ, कीसान कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष राहुल उगले, विश्वनाथ राऊत, काकासाहेब चव्हाण, हनुमंत मुरुमकर पाटील, राजेंद्र गोरे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आ. रोहित पवार म्हणाले की जामखेड शहर मेडिकल हब बनवायाचे आसेल तर सर्व डॉक्टरांनी एकत्र येण्याची गरज आहे. जामखेड मध्ये हॉस्पिटल ची संख्या वाढली की आर्थिक उलाढाल वाढते. बारामती सारखे कर्जत जामखेड मध्ये देखील मोठी हॉस्पिटल झाली पाहिजेत. कर्जत जामखेड मध्ये देखील उपजिल्हा रुग्णालय उभे करत आहेत या ठिकाणी गरीब व गरजू रुग्णांना फायदा होणार आहे. जामखेड येथे देखील खाजगी रुग्णालयात महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून लवकरच रुग्णांसाठी डायलेसिस सेंटर सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे डायलेसिस रुग्णांना आता नगर येथे जाण्याची गरज भासणार नाही. आरोग्यासाठी अडचण येणार नाही याची काळजी डॉक्टरांनी घ्यावी तसेच रुग्णांच्या नातेवाईकानकडुने दबाव तंत्र होत आसेल तर कायदेशीर कारवाई होईल. गरीब रुग्णांना चांगली व अल्प दरात सेवा द्या असा सल्ला देखील यावेळी आमदार रोहित पवार यांनी शहरातील डॉक्टरांना दिला.
या नंतर हॉस्पिटल चे संचालक डॉ मनोज शिंदे यांनी हॉस्पिटल बाबत माहिती देताना सांगितले की साडेतीन वर्षांपासून दत्त बालरुग्नालयाची सुरूवात केली आहे. अत्तापर्यंन्त सहा हजार बालकांवर उपचार केले आहेत तर अडीच हजार नवजात बालकलाकांवर देखील उपचार केले आहेत. तसेच बालकांच्या सर्व अजारांवर उपचार केले आहेत पेशंट व नातेवाईक यांची आरोग्य बाबत हेंडसाळ होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असे आश्वासन डॉ शिंदे यांनी दिले. या नंतर डॉ भास्कर मोरे, दत्तात्रय वारे, राजेंद्र कोठारी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.






