कर्जत प्रतिनिधी

कर्जत तालुका काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी किरण पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या सभागृहामध्ये कर्जत तालुका काँग्रेस पक्षाची बैठक झाली. यावेळी पक्षाचे निरीक्षक म्हणून कैसर आझाद व अनुराधा नागवडे हे उपस्थित होते. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले व एडवोकेट कैलास शेवाळे, शंकर देशमुख ,सचिन घुले ,श्रीहर्षल शेवाळे, बापूसाहेब काळदाते, किशोर तापकीर, मिलिंद बागल, मुबारक मोगल ,ओकार तोटे, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, संतोष भोसले, ज्योतीराम काळे ,अविनाश मासाळ, नावेद पठाण, अंबादास आखाडे, जावेद सय्यद, विनोद राऊत, गोकुळ इरकर, अमोल थिटे, जयदीप सूर्यवंशी हे उपस्थित होते.
कर्जत तालुका काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्ष निवडीसाठी येथे बैठक संपन्न झाली. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे समर्थक असलेले किरण पाटील यांची तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते फेर निवड करण्यात आली आहे. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा कमिटी साठी एडवोकेट कैलास शेवाळे ,किशोर तापकीर, शंकर देशमुख, मिलिंद बागल, फिरोज मोगल ,मोनाली तोटे यांच्या नावाची शिफारस केली असून राज्यासाठी प्रवीण घुले व तात्यासाहेब ढेरे यांची नावे पाठविण्यात आली आहे.
या निवडीनंतर बोलताना किरण पाटील म्हणाले की कर्जत तालुक्यामध्ये पक्षाचे धोरण ,विचारधारा पोहोचविण्यासाठी आपण गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असून पुढील काळामध्ये देखील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , राजेंद्र नागवडे,ज्ञानदेव वाफारे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत राबवण्यात येतील व माझी पुन्हा फेर निवड केल्याबद्दल मी कर्जत तालुक्यातील सर्व मार्गदर्शक नेत्यांचे आभार मानतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here