जामखेड प्रतिनिधी

राष्ट्रीय काँग्रेसच्या जामखेड तालुकध्यक्षपदी शहाजी राजेभोसले तर शहराध्यक्षपदी देवीदास भादलकर यांची फेर निवड करण्यात आली .पक्षाचे निवडणूक निरीक्षक कैसर आझाद व अँड.कैलास शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांच्या प्रमुख उपस्थित ही निवडणूक पार पडली.

यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तात्या ढेरे, जेष्ठ नेते अंकुशराव उगले, कर्जतचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष किरण पाटिल, विशाल डूचे, युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष राहुल उगले, जमीर सय्यद, कुंडल राळेभात, मिलिंद बागल, आदेश सरोदे, महादेव बहिर, रामदास राऊत व पक्षाचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये ही निवडणूक पार पडली.

नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले व शहराध्यक्ष देवीदास भादलकर यांचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात , आ.सुधीर तांबे, युवा नेते सत्यजीत तांबे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा समनव्यक ज्ञानदेव वाफारे, अंकुशराव उगले, युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष राहुल उगले, महिला तालुकध्यक्ष ज्योतिताई गोलेकर, मंज़र सय्यद, गौतम पवार, विशाल डुचे, युवकचे तालुक़ा अध्यक्ष शिवराजे घुमरे, अशोक पाटिल, सुनील शिंदे, फ़िरोज़ पठाण, जावेद शेख, युवकचे शहराध्यक्ष विक्रांत अब्दूल, ज़मीर सय्यद, कुंडल राळेभात, अवधूत पवार आदीनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here