कर्जत प्रतिनिधी
कर्जत येथील तहसीलदार नानासाहेब आगळे व महसूल पथकावर वाळू माफिया ने डंपर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.अखेर तब्बल २२ किमी पाठलाग करून पथकाने डंपर पकडला आणि दोघांना अटक करण्यात आली आहे.ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या पथकामध्ये तहसीलदार नानासाहेब आगळे, कामगार तलाठी डी एन केसकर, गणेश सोनवणे, अविनाश रोडगे, डी एम बिरुटे , संजय दुधभाते, अशोक नारोड,पोलीस कर्मचारी श्री पळसे, श्री नारुटे यांचा समावेश होता.
याबाबत घडलेली घटना अशी की,
कर्जत तालुक्यातील कापरेवाडी रस्त्याने अवैध वाळू वाहतूक करणारा एक डंपर येत असल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांना गुप्त माहिती दारकडून मिळाली त्यानंतर त्यांनी तात्काळ महसूल विभागाचे भरारी पथकासह छापा टाकला. व अवैध वाहतूक करणारा डंपर पकडला.
डंपर पकडल्यावर त्यावरील ड्रायव्हर लक्ष्मण भुजंग काळे राहणार वालवड तालुका कर्जत व क्लिनर शुभम भाऊसाहेब मंडलिक राहणार शितपूर तालुका कर्जत यांनी मालकास फोन करून वाळू सह गाडी पकडल्याचे सांगितले असता मालकाने डंपर पळवून घेवून जा असे सांगितले असता,
दोघांनी संगणमत करून तहसीलदार नानासाहेब आगळे व भरारी पथकावर अंगावर ढंपर घातला आणि हुलकावणी देत डंपर शिंदेवाडी रोड ने पळवून नेला.
अंगावर डंपर आल्यामुळे काही काळ तहसीलदार व कर्मचारी हे घाबरले नाहीत ,त्यानंतरही तहसीलदार व त्यांच्या पथकाने तब्बल बावीस किलोमीटर डंपरचा पाठलाग केला. डंपर ड्रायव्हर याने रस्त्याने भरधाव वेगाने गाडी चालवली, पाटला करणारे तहसीलदार व दुचाकीवरील कर्मचारी त्या डंपरच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना तो डंपर त्यांना रस्त्याच्या दोन्ही बाजूने गाडी चालवून पुढे जाऊ देत नव्हता. अशाही परिस्थितीत तहसीलदार यांनी जीव धोक्यात घालून रस्त्याच्या कडेने गाडी डंपरच्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्याठिकाणी देखील पुन्हा हुलकावणी दिली. त्यावेळेस समोरून एखादे वाहन आले असते तर त्या डंपर नेते उडवली असतील तितक्या वेगाने तो गाडी चालवत होता रात्रीची वेळ होत
तरीदेखील तो कसा थांबत नव्हता. अखेर कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी गावाच्या फाट्यावर काही नागरिकांनी हा डंपर थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी त्यांना देखील हुलकावणी दिली आणि तसाच भारतापुढे निघून गेला टाकळी गावाच्या परिसरात रस्त्यावर काम सुरू असल्यामुळे रस्त्यावर पाईप पडलेले होते व अडथळा निर्माण झाला होता त्या ठिकाणी तहसीलदार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या डंपरला त्यांची गाडी आडवी उभा केली आणि डंपर पकडला.
दरम्यान त्या ठिकाणी ग्रामस्थही पाटला करत पोहोचली आणि या सर्वांनी ड्रायव्हर व क्लिनर यांना चांगलाच चोप दिला आणि त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केले.
याप्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये ड्रायवर व क्लीनर यांना अटक करण्यात आली असून यांच्या विरोधात व डंपर मालक विनोद उर्फ आबा कदम राहणार माहीजळगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






