जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील पाटोदा, भवरवाडी व खामगाव परीसरात आज झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. शेतातील झाडे उखडून पडले असुन शेतीचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे ज्या घरांचे नुकसान झाले आहे त्या ठिकाणी तातडीने त्या घरांचे पंचनामे करून मदत करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.

गेल्या आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर जामखेड शहरासह तालुक्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील पाटोदा, भवरवाडी व खामगाव या भागात मोठय़ा प्रमाणात वादळी पावसाने नागरिकांची व शेतकर्‍यांची तारांबळ उडाली. भवरवाडी याठिकाणी श्रीकांत पारवे, बाळु पारवे, कुंडल गायकवाड व देविदास काळे प्रकाश श्रीरंग खवळे यांच्या घरांची पडझड होऊन यातील काही घरांचे पत्रे उडाल्याने संसार उघडय़ावर पडला आहे.

पाटोदा या ठिकाणी देखील वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आण्णासाहेब गव्हाणे यांचे चिंचेचे झाड पडले तर दत्तात्रय कापसे यांच्या शेतातील लिंबोनीच्या बागातील झाडे उखडून पडले आहेत. तर नाना गव्हाणे यांच्या घराचे देखील नुकसान झाले आहे अशी माहिती पाटोदा येथील माजी सरपंच गफारभाई पठाण यांनी दिली. पाटोदा, भवरवाडी व खामगाव परीसरात अनेक ठिकाणी पावसाने बऱ्याच शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तरी महसुल विभागाने लवकरात लवकर पंचनामे करून मदत करण्याची मागणी ग्रामस्थांनसह पाटोदा ग्रामपंचायत चे सदस्य दिनकर टापरे यांनी केले आहे.

जामखेड तालुक्यातील सर्वच भागात चांगला पाऊस झाला असुन पाटोदा व भवरवाडी या ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने काही घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुळे तातडीने ज्या घरांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील अशी माहिती जामखेड चे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here