जामखेड प्रतिनिधी

खर्डा येथील सेवा कै. नितीन वेणूनाथ गोलेकर सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक 10 जून रोजी होत असून या निवडणुकीत चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता जाऊ देऊ नका असे आवाहन त्यांनी केले.

शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच आसाराम गोपाळघरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, चेअरमन चंद्रकांत गोलेकर, एजाज जिकरे, मुकुंद गोलेकर, सुनील साळुंखे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर, महालिंग कोरे, दीपक जावळे, राजेंद्र गोलेकर, ज्ञानेश्वर थोरात, बापू ढगे इत्यादी उपस्थित होते. ते पुढे बोलताना म्हणाले की स्वर्गीय नितीन गोलेकर यांनी ही संस्था तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली असून सर्व जाती-धर्माच्या शेतकऱ्यांना त्यांनी योग्य न्याय देऊन त्यांनी संस्था नावारूपाला आणली आहे,, आमदार रोहित पवार यांच्या विकासाच्या राजकारणाला साथ देण्यासाठी व शेतकऱ्यांची पुढील प्रश्न हे सहकारी सेवा सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून सोडविले जाणार असून येणाऱ्या सोसायटीच्या निवडणूकित शेतकरी विकास पॅनलच्या सर्वच उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे सुहास सोसायटीच्या प्रचार समितीच्या माध्यमातून खर्डा गावातून भव्य मिरवणूक काढून प्रत्येक मंदिरात नारळ फोडून प्रचंड फटाक्यांच्या आतषबाजी करण्यात आली.
याप्रसंगी ज्येष्ठ मोहनराव लोखंडे, सुहास पाटील, सुनील लोंढे, राजू सय्यद,किरण गोलेकर, कपिल लोंढे, हरी गोलेकर, ज्ञानेश्वर इंगवले, सुरेश शिंदे, बाळासाहेब गीते, सुरेश शिंदे, विकास शिंदे, विष्णू जोरे, राम ढेरे, भगवान जोरे,मच्छिंद्र पिंगळे, भीमा घोडेराव, भरत अंकुश, सुशील शिंदे, संजय पेडगावकर, दीपक गोलेकर, संदिपान गेजगे, केशव गोपाळघरे, सुनील सुर्वे, परमेश्वर होडशीळ, गौतम गोपाळघरे इ. सह खर्डा ग्रामस्थ प्रचंड संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here