पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची माहिती!
रोखठोक, अहमदनगर
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आणि यशस्विनी महिला ब्रिग्रेडच्या अध्यक्ष रेखा जरे हत्याप्रकरणात अटक केलेल्या पाच आरोपी कडून तपास करताना मुख्य सूत्रधाराची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
अहमदनगरचे जिल्हा पोलीस अध्यक्ष मनोज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेचा मुख्य सूत्रधार जेष्ठ पत्रकार बाळासाहेब बोटे यांनी या हत्याचा कट रचला असून त्यांनीच अटक केलेल्या पाच आरोपींना रेखा जरे यांची सुपारी दिली होती. तर या खुनाचा मुख्य आरोपी बाळासाहेब बोठे यांना अटक करण्यासाठी पोलिसांकडून पाच पथके रवाना झाली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अध्यक्ष मनोज पाटील यांनी दिली.
दि. ३० नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी पुण्याहून अहमदनगर येत असताना जतेगाव घाटात त्याच्या गाडीला कट मारला म्हणून दुचाकी स्वार आणि रेखा जरे यांच्यात बाचाबाची झाली. दोन्ही आरोपीं दारूच्या नशेत असल्याने त्यांना रेखा जरे यांची नेमकी कोणती गाडी आहे हे कळत नव्हते, यामुळे आरोपींनी आधी गाडीचा फोटो पाठवला मुख्य सूत्रधारला पाठवला त्या पासून त्यांना ग्रीन सिग्नल भेटल्यावर त्या आरोपीने गाडीत डोकावले त्यात तीन महिला होत्या, यापैकी रेखा जरे कोण आहे यासाठी परत एखादा फोटो काढत मुख्य सूत्रधाराला पाठवले त्यालाही ग्रीन सिग्नल भेटल्यावर आरोपीने जरे यांचे केस पकडून अतिशय निर्दयपणे गळ्यावर वार करून खून करण्यात आला.