जामखेड प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज दि ३ रोजी नगर परिषद वर्ग २ / ३ व ४ या सर्व कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२० या दोन महिन्याचे थकीत पगार देण्यात येण्यासाठी “भीक मागो”दंडवट, आंदोलन करून तहसील कार्यालयाच्या समोर प्राणांतिक उपोषण सुरू केले होते. अखेर नगरपरिषदेच्या आश्वासनानंतर सदरचे उपोषण मागे घेण्यात आले.
या भीक मागो व दंडवट,आंदोलनाची सुरुवात सकाळी ठीक दहा वाजता गोरोबा टॉकीज समोरून होऊन ते मच्छी मार्केट, खर्डा चौक, जय हिंद चौक, कोर्ट गल्ली येथून सुरुवात झाली. यानंतर जामखेड तहसील कार्यालया समोर साडेबारा वाजता हे उपोषण सुरू करण्यात आले. या दरम्यान बोलताना अॅड अरुण जाधव यांनी सांगितले की नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या व त्यांच्या कामाच्या पगारासाठी वेळोवेळी आंदोलन करण्याची वेळ जर येत असेल तर यासारखे दुर्दैव काय? त्याची प्रशासनाने दखल घेतली पाहिजे. ऐन दिवाळीच्या सणाला देखील नगरपरिषदेने गाव स्वच्छ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आनंदात दिवाळी खाऊ दिली नाही. त्यांच्या कष्टाचा पगार दिला नाही. उलट त्यांची चेष्टा करणे, अपमान करणे व त्यांच्यावर खोट्या-नाट्या कारवाया करणे असे काम परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व त्यांच्या सोबतच्या काही कर्मचाऱ्यांनी केले आहे असा आरोप भटके विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी बोलताना केला होता.
या नंतर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांनी उपोषण स्थळी भेट दिली. व उपोषणकर्त्यां च्या आडचणी जाणुन घेतल्या व येत्या २४ डिसेंबर पर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार करण्यात येतील असे अश्वासन दिल्या नंतर सदरचे उपोषण मागे घेण्यात आले.
या उपोषणत भटके विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव, लोकाधिकार आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब ओहोळ,वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अतिश पारवे, विशाल पवार, भीमराव चव्हाण,द्वारका ताई पवार, राकेश साळवे, सचिन भिंगारदिवे , सागर भांगरे, संतोष चव्हाण, वैजीनाथ केसकर, बाळासाहेब भालेराव,अंकुश पवार ,मच्छिंद्र जाधव, आजिनाथ शिंदे, विशाल जाधव, कल्याण आव्हाड, आकाश जाधव, हरी जाधव, सागर आहेर, पप्पू सदाफुले, सलीम मदारी, अतुल वाघमारे, अमोल ( पिनू) घायतडक, अभिमान समुद्र,व योगेश सदाफुले आदी सहभागी झाले होते.