पुणे : कोणत्याही क्षेत्रात स्वतःला वाहून घेतल्यानंतर यशाची फार मोठी उंची गाठता येते, हे अनेकांनी सिद्ध करून दाखविले आहे. बीडच्या मातीतला तर हा फार मोठा गुण आहे. म्हणूनच कोणतीही फिल्ड निवडली, तरी त्यात यशोशिखर गाठून नावलौकिक मिळविण्याचे काम बीडकर करतात. बीड ची वर्षा पाटील ही त्या पैकी एक तीने नाटकांबरोबरच विविध मालिका, मराठी चित्रपट आणि हिंदी मालिकांमधून उत्कृष्ट अभिनय करून छोट्या पडद्याबरोबरच फिल्म इंडस्ट्रीतही स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अस्सल मराठी कलाकार म्हणून पुण्यात वर्षा पाटील हीने आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे.
बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेचे नुकतेच १००० भाग पुर्ण झालेल्या या आता मालिकेत महालींगरायाची कथा सुरु आहे आणि याच कथेमध्ये महालिंगरायाच्या आईच्या भूमिकेत सर्वांची लाडकी वर्षाराणी म्हणजेच बीड जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील कलाकार वर्षा पाटील अशी तीची ओळख आहे. वर्षा ही मुळ बीड जिल्हातील मोरेवाडी या छोट्याशा गावात रहाणारी मुलगी आहे. तिला तशी शालेय जिवनापासूनच कलेची आवड होती पण खेड्यागावातून तिला तिचे हे स्वप्न पुर्ण करता आले नाही. लग्नानंतर ती पुण्यात आल्यामुळे तिच्या स्वप्ननांना दिशा मिळाली.
एक झुंज वादळाशी या व्यावसायिक नाटकातून तिने अभिनय क्षेत्रात आपल्या स्वप्ननांचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. आणि यानंतर सातत्य ,जिद्द,चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्नाने तिनं मराठी इंडस्ट्री मधे अनेक कामं मिळवली.
तिचा हा प्रवास खडतर असला तरी तिच्या सोबत तिच्या आईवडिलांचे आशीर्वाद आहेत. तसेच तिच्या मुलगा व पतीचीही तिला खंबीर साथ मिळाली आहे.
आजपर्यंत वर्षा पाटील हीने, घेतला वसा टाकू नको, आई कुठे काय करते, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, गाथा नवनाथांची, ज्ञानेश्वर माऊली अशा अनेक मराठी मालिकेत तिने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवुन प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याच बरोबर वरात घुसली घरात, प्रेमाच्या प्रेमात, रंगभूमी शपथ खेरीज अशा नावजलेल्या नाटकांमधेही तिने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तसेच महिंद्रा ट्रॅक्टर, श्री अमृततुल्य चहा , त्रिमूर्ती उद्योगसमूह यांच्या व अशा अनेक व्यावसायिक जाहीरातीमधे ही तिने काम केलेले आहे. आपल्या पाठीवर कोणाचाही खंबीर हात नसला तरी फक्त अभिनयाच्या जोरावर आणि मेहनतीच्या बळावर कलाकार वर्षा पाटील इथं पर्यंत पोहचली आहे.
चौकट
फील्म इंडस्ट्रीत क्षेत्रात येणाऱ्या सर्व नवोदित कलाकारांना सांगू इच्छीते की जर तुमचं खरच तुमच्या अभिनयावर विश्वास असेल आणि कलेवर प्रेम असेल तर तुम्ही या क्षेत्रात नक्कीच यशस्वी होवू शकता. फक्त प्रयत्न करत रहा यश नक्की मिळत.
शेवटी प्रयत्नाअंती परमेश्वर असतो हेच खरे आहे त्यामुळेच मी इथपर्यंत पोहचले आहे असे मत अभिनेत्री वर्षा पाटील हीने रोखठोक न्यूज शी बोलताना सांगितले आहे.