जामखेड प्रतिनिधी
मा. आ. रोहित पवारांच्या माध्यमातून आपल्या जामखेड व कर्जत मतदारसंघातील माता भगिनींच्या कला गुणांना वाव देण्यासाठी खेळ पैठणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दिवसभराच्या कामातून महिलांना विरंगुळा मिळावा, त्यांच्या कला, आवडी निवडी जोपासण्यात याव्या हे जाणून रोहित पवारांनी दोन्ही तालुक्यात मिळून एकूण १८ ठिकाणी खेळ पैठणीचा महिला अस्मितेचा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याचा श्री गणेशा येत्या १८ एप्रिल २०२२ रोजी, खर्डा इंग्लिश स्कूल, खर्डा येथे संध्याकाळी ४ ते ७.३० वाजता होईल. यामध्ये विविध खेळ, कलागुणांनाचे सादरीकरण करण्यात येईल याच बरोबर विजेत्या महिलांना आकर्षक बक्षीसे देण्यात येतील त्यामध्ये पैठणी, सोन्याची नथ व इतर ही अनेक बक्षीस जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे. तसेच, उपस्थित सर्वच भगिनींना रोहित पवारांच्या माध्यमातून आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.
सदरचा कार्यक्रम सोमवार दि १८ एप्रिल रोजी खर्डा येथील खर्डा इंग्लिश स्कुल, मंगळवार १९ एप्रिल रोजी नान्नज येथील नंदादेवी विद्यालय, नान्नज, बुधवार २० एप्रिल रोजी जामखेड शहरातील ल.ना.होसिंग विद्यालय, गुरुवार २१ एप्रिल रोजी अरणगाव येथील अरण्येश्वर विद्यालय, शुक्रवार २२ एप्रिल रोजी साकत येथिल जिल्हा परिषद शाळा साकत, शनिवार २३ एप्रिल रोजी नायगाव येथील श्री नाथ मंदीराच्या शेजारी, तर रविवार २४ एप्रिल रोजी जवळा येथील छत्रपती शिवाजी विद्यालय, या ठीकाणी आयोजित करण्यात आला आहे. सर्व ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाची वेळ सायंकाळी ४ ते रात्री ७.३० वाजेपर्यंत असणार आहे. सदर कार्यक्रमास कर्जत – जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या संचालिका सौ. सुनंदा पवार यांनी पंचक्रोशीतील सर्व माता भगिनींना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.