राजेंद्र जैन/कडा
—————
जैन धर्माचा पाया हाच सत्य अहिंसेवर अवलंबून आहे. त्यामुळे भगवान महावीरांचे संस्कार मानवी जीवनात परिवर्तन घडवून आणणारे आहेत. वचन, आचार व व्यवहार हे अहिंसेचे मुळरुप असल्याचे प्रतिपादन पुणे येथील परिवहन वाहन निरिक्षक अविनाश दळवी यांनी केले.
कडा शहरात येथील सकल जैन बांधवांकडून मागील दोन वर्षात पहिल्यांदाच कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर महावीर जन्मोत्सवानिमित्त साजरा करण्यात आला. या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात मला समजलेला जैन धर्म या विषयावर ते प्रमुख पाहूणे म्हणून दळवी बोलत होते.
पुढे बोलताना अविनाश दळवी म्हणाले की, जैन धर्मातील पंचतत्व हेच सत्य वचन आहे. मानवी जीवनासाठी एक गाईडच आहे. पंचतत्व जर घराघरात अवलंबल्यास सर्व कार्य सफल होत असतात. जैन धर्माचा पाया हा सत्य अहिंसेवर अवलंबून असून नवकार मंत्र हा मानवाच्या कल्याणासाठी महामंत्र आहे. त्यामुळे सत्य हेच जीवन असून सत्याच्या आज्ञात वावरणारा माणूस मृत्यूलाही पार करु शकतो. सत्याला पंचतत्वात अधिक महत्व आहे. वचन, आचार व व्यवहार हे अहिंसेचे मुळरुप आहेत. सजीव, निर्जीव या कोणत्याच वस्तूचा गरजेपेक्षा जास्त संचय करु नये, हिच भगवान महावीरांची शिकवण आहे. कुणाचाही व्देष करु नये, पृथ्वीवरील प्रत्येक प्राणीमात्रावर दया करावी. समाधानी जीवन जगण्यासाठी भगवान महावीरांचे संस्कार अन् विचारांचे अनुकरण केल्यास मानवाच्या वाट्याला दुखं येणार नाहीत. आपल्या आत्म्याची अनुभूती करण्यासाठी उपवास करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे स्वत:मध्ये प्रज्ञा प्रगट होत असल्याचे दळवी यांनी सांगितले. तर नगर येथील प्रसिध्द साहित्यिक संजय कळमकर म्हणाले की, भगवान महावीरांची शिकवण म्हणजे मानवी कल्याणाचा सर्वोत्तम मार्ग आहे. स्वत:च्या मनावर विजय प्राप्त करणे म्हणजेच, भगवान महावीर आहेत. सत्य, अहिंसा अन् परोपकार हा जैन धर्माचा मुळ गाभा आहे. महावीरांचे विचार, आचार हे पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत. त्यामुळे महावीरांची शिकवण मानवासाठी कल्याणकारी आहे. त्यांच्या विचाराचे अनुकरण करणे तुमच्या आमच्यासाठी प्रगतीचा मार्ग असल्याचे कळमकर यांनी सांगितले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर कडा शहरात प्रथमच जैन बांधवांकडून भगवान महावीर यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळयात सकल जैन मोठ्रया आनदोत्सवात सहभागी झाले होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगर येथील प्रख्यात साहित्यिक संजय कळमकर, वर्धमान जैन श्रावक संघाचे अध्यक्ष रतिलाल कटारिया, पी. जी. मेहेर, जेष्ठ शिक्षक शिंगवी, डाॅ. अशोक गांधी, अमोलक जैन शिक्षण संस्थेचे कांतीलाल चानोदिया, हेमंत पोखरणा, अजय धोंडे, माजी सभापती संजय ढोबळे, रमझान तांबोळी, प्राचार्य हरिदास विधाते, पत्रकार राजेश राऊत, दिगंबर बोडखे, राजेंद्र जैन यांच्यासह संचालक योगेश भंडारी, मधुकर ढोले, सुभाष धुमाळ, प्रफुल्ल भंडारी, ग्रा प सदस्य सचिन शिंदे, श्रीपाल धुमाळ, अनिल ढोबळे, डाॅ. महेंद्र पटवा, बिपीन भंडारी, अनिल मुथ्था, डाॅ भळगट, सुभाष गुंदेचा, डाॅ उमेश गांधी, संजय मेहेर, संतोष औटी, शंकर देशमुख, प्रा राधाकृष्ण जोशी, बाबुलाल भंडारी, सुशिल पटवा, संजय भंडारी, हिरालाल बलदोटा, रतनसेठ बोरा, सुमित भंडारी, संदीप भळगट आदी प्रतिष्ठीत नागरिकांसह जैन श्रावक, श्राविका मोठ्रया संख्येने उपस्थित होते.
—-%%———–






