जामखेड प्रतिनिधी
जवळा सोसायटी ही कोणाची मक्तेदारी नाही व खाजगी मालमत्ता नाही हे विरोधकांनी लक्षात ठेवावे. मला टार्गेट करण्यासाठी सर्व विरोधक पुढारी एकत्र येऊन लढत आहेत. मात्र शेतकर्यांना न्याय देण्यासाठी मी निवडणूकीत उतरलो आहे. अत्तापर्यंन्त संस्थेत सर्व चुकीच्या गोष्ट होत आहेत त्यामुळे चुकीच्या लोकांना या निवडणूकीत पाय उतार करा असे अवहान युवा सरपंच प्रशांत शिंदे यांनी केले.
जवळा विविध कार्यकारी सेवा सोसायटीसाठी पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने शेतकरी ग्रामविकास पॅनल उभा करण्यात आला आहे.या प्रचाराचा भव्य शुभारंभ आज दि १३ रोजी सकाळी करण्यात आला आला. या वेळी गावातून भव्य अशी प्रचारफेरी काढण्यात आली होती.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की सोसायटीच्या निवडणुकीमध्ये विरोधक हे विकास काय करणार या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा फक्त टीका व द्वेष करण्यात पटाईत आहेत. विरोधकांनी १३ जागांसाठी ४४ अर्ज भरले ते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी भरले. मागील सोसायटीत असताना कोणाला सभासद केले नव्हते कारण त्यांना त्यांची सोईची माणसं सोसायटीत पाहिजे होते. आमचा पॅनल करण्याचा उद्देश प्रत्येक शेतकर्याला सभासद करणे हा आहे. माझे कोणी या निवडणुकीत उभे नाही तरी देखील मी फक्त शेतकऱ्यांसाठी लढत आहे. माझ्या पॅनल मधिल प्रत्येक उमेदवार हा चेअरमन पदाचा दावेदार आसेल. चेअरमन पदासाठी विरोधकांनी निवडणूक लढवायची आहे. शेतकर्यांनो तुमचा ऊस जळाला कोणता पुढारी आला फक्त मी धाऊन आलो आता निवडणूका आल्याकी विरोधक तुमच्या दारात उभे रहातात अडचणीच्या काळात विरोधक कोठे जातात. स्वर्गीय लोकनेते श्रीरंगराव कोल्हे व लोकनेते स्वर्गीय प्रदिप आबा पाटील यांच्या मुळेच मी सरपंच झालो. वारसदार म्हणून मिरवत आसलेले यांचा पत्ता चालेना त्यामुळे वारसदारांचा चुकीच्या पद्धतीने वापर चालु आहे. ग्रामपंचायती प्रमाणे सोसायटीला देखील साथ द्या
माजी सभापती सुभाष अव्हाड बोलताना म्हणाले की प्रशांत शिंदे यांना विरोध करण्यासाठी सर्व पुढारी एकत्र आले आहेत. अगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत अडसर ठरेल म्हणून प्रशांत शिंदेंना विरोध करत आहेत. तालुक्याचे सभापती पद दिले आसले तर स्वर्गीय श्रीरंगराव कोल्हे व लोकनेते स्वर्गीय प्रदिप आबा पाटील यांचे मोठे सहकार्य मला मिळाले होते. सर्व वाड्यांनी प्रशांत शिंदे यांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे त्यांच्या पॅनल चा विजय निश्चित आहे.
या वेळी विविध मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले वीस गुंठे आसलेल्या शेतकऱ्यांनी उतारा आणुन द्यावा त्यांना सभासद करुन घेतले जाईल, लोकांनी आम्हाला डोक्यावर घेतले आहे ती जनता कायम डोक्यावर ठेवणार आहे हे विरोधकांनी लक्षात ठेवावे. सर्व सामान्य बहुजनांची ही सत्ता आहे. कै. प्रदीप आबांचा वारसदार कोणाच्या दावणीला बांधला आहे याचा विचार न करता कै. प्रदीप आबा पाटील यांचे विचार घेऊन पुढे जायचे आहे. शेतकर्यांना कर्ज मिळाले पाहिजे खेकड्याच्या प्रवृत्ती च्या विचारसरनींच्या माणसांना खाली ओढायचे आहे जवळ्याच्या विकासाला खिळ घालण्याचे प्रयत्न विरोधक करत आहेत मात्र त्यांचा डाव हाणून पाडल्या शिवाय रहाणार नाही.
या वेळी शेतकरी ग्रामविकास पॅनल चे प्रमुख मुरलीधर हजारे, दशरथ कोल्हे, प्रमोद कोल्हे, शंकर हजारे, किसन गोयकर, माजी सभापती सुभाष आव्हाड, शिवानंद कथले, पॅनलचे जेष्ठ उमेदवार कुंडल गाडवे, बाजीराव पठाडे, भाऊ कसरे, राम पाटील, सावता, मतेवाडीचे माजी सरपंच अप्पासाहेब मते, रफीकभाई शेख, उपस्थितीत होते. या वेळी शेतकरी ग्रामविकास पॅनलला किसन गोयकर पाटील, भाऊसाहेब सुळ, शिवानंद कथले, सागर पागीरे, गोयकर पाटील, बाजीराव खाडे, शिवराज देवमुंडे, प्रकाश करगळ, रफीकभाई शेख, हबीबभाई शेख, गणेश आव्हाड, जयराम आव्हाड, बिबीशन लेकुरवाळे, अंगद मुळे, पोपट करगळ, गोरख जाधव, आनंता लेकुरवाळे, बाजीराव आण्णा पठाडे, बाबा अव्हाड, राजाभाऊ कांबळे , कल्याण काका रोडे, बबन गोयकर, रमेश पाटील , कांतीलाल पाटील, तानाजी पवार, राजेंद्र कसरे, अमोल जैन यांनी शेतकरी ग्रामविकास पॅनल ला जाहीर पाठिंबा दिला.






