पाटोदा प्रतिनिधी

अतिक्रमित ईनामी दर्गाह बांधकामाचे फोटो काढले म्हणून पाटोदा येथील पत्रकार शेख जावेद शेख रज्जाक यांच्यावर बुधवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी लोखंडी गज, दगडांचा सर्रास वापर केला असून यात पत्रकार शेख गंभीर जखमी झाले आहेत.

या बाबत मिळालेली हकीकत अशी की पाटोदा शहरातील राजमहंमद चौक सांगवी रोड वर असणाऱ्या एका ईनामी जमिनिवर अनाधिकृत बांधकाम करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पत्रकार शेख जावेद शेख रज्जाक यांनी घटनास्थळी जाऊन त्या बांधकामाचे फोटो काढले. या रागातून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असल्याचं पत्रकार शेख यांनी सांगितलंय या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी बीडला हलविण्यात आले आहे.पाटोदा पोलीस या बाबत तपास करत आहेत.

मराठी पत्रकार परिषद बीड आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या घटनेचा निषेध केला असून हल्लेखोरावर कठोर कारवाई करून त्यांना तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी एस.एम देशमुख यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here