जामखेड प्रतिनिधी
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या सर्वसमावेशक धोरण व सक्षण नेतृत्वाने प्रभावित होऊन जामखेड येथील शेकडो एसटी कर्मचार्यांनी आम आदमी पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
आम आदमी पार्टीचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांच्याशी नुकतीच दूरध्वनीवरून चर्चा झाली. जामखेड आगारासमोर अंदोलनास्थळी सर्व कामगार व आम आदमी पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष संतोष नवलाखा, तालूकाध्यक्ष बजरंग सरडे यांच्यामध्ये अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी एसटी कामगार सेनेचे माजी जिल्हाकार्यध्यक्ष प्रकाश गावडे, पप्पू घायतडक, आशोक वारे, हनुमंत अंधारे, विष्णू घूले, दिलीप वारे,शिवदास टेकाळे ,विठ्ठल जायभाय, जीवन घायतडक ,कल्याण थोरात ,किरण भांगे, संजय खोत ,मोहन ढोले,रघुनाथ वारे,चंदु वारे,योगेश पोपळे,हनुमंत आंधाळे,सचिन शिंदे,दता जाधव,सुनिल जगताप ,नारायण जायभाय, दिनकर उघडे, सुभाष नागरगोजे ,योगेश कानडे,नारायण जायभाय,खटावकर, किरण जायभाय,सिकंदर बनसोडे,किरण उघडेआदी एसटी कामगार उपस्थित होते.
यावेळी प्रकाश गावडे मनोगत बोलताना सांगितले राज्यात एसटी कामगारांचे गेल्या पाच महिन्यांपासून राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन चालू आहे. राज्यातील सरकारने आद्याप दखल घेतली नाही. कामगारांच्या समस्यांवर एकही राजकीय पक्ष मनापासून सहकार्य करत नाही. आत्तापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या 119 जणांनी आत्महत्या केल्या असून याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहेत.आम आदमी पार्टीचे नेतृत्व व धोरण सक्षम आहेत. अशी जाणीव झाली व पुढे कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम आदमी पार्टी सक्षम आहे. त्यामुळे सर्व गट तट बाजूला ठेवून अंदोलनातील एसटी कामगारांनी जाहीरपणे आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे.
यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष नवलाखा मनोगत व्यक्त करताना म्हणाले की सरकारने जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले तर विरोधकांनी राजकारण मात्र आम आदमी पार्टी या कामगारांच्या आंदोलनात पहिल्या दिवसापासून सहभागी आहे. पुढेही काम करणार आहे.