पदवीधरसाठी होणा-या मतदान बुथवर होणार आरोग्य तपासणी

कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे आरोग्य विभागाकडून आवाहन
——————-
कडा / वार्ताहर
———
पदवीधर मतदार संघासाठी आज मंगळवारी मतदान होत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता तालुक्यातील प्रत्येक मतदान बुथवर आरोग्य विभागाकडून मतदारांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी होत असलेली निवडणुक प्रक्रिया
आज मंगळवार दि.१ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सांय ५ यावेळेत पार पडत आहे. आष्टीसह तालुक्यातील कडा, दादेगाव, धामणगाव, दौलावडगाव, पिंपळा, टाकळसिंग, धानोरा, डोईठाण, ह. आष्टा इत्यादी अकरा ठिकाणच्या मतदान बुधवर मतदान होत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून आरोग्य विभागाकडून खबरदारी घेण्यात येत आहे, त्यासाठी प्रत्येक मतदान बुथवर एका वैद्यकीय अधिका-यासह दोन आरोग्य कर्मचा-याची नेमणूक करण्यात आलेली आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मतदान करण्यासाठी येणा-या प्रत्येकाची आरोग्य तपासणी होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझरचा वापर करुन कोरोना विषाणू प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. नितीन मोरे यांनी पत्रकाव्दारे केले आहे.
——%%——–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here