कुटुंबासह पुण्यातून येताना जातेगाव शिवारात धारदार शस्त्राने वार

जामखेड प्रतिनिधी

पुण्याहून नगरला चारचाकी वाहनाने येत आसताना पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तीनी त्यांची गाडी आडवुन रेखा जरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.

रेखा जरे व त्यांचे कुटुंबीय पुण्याहून कारमध्ये येत असताना जातेगाव घाटात हत्या करण्यात आलेली आहे. घाटातून रेखा जरे यांच्या फोर व्हीलर गाडीला दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी ओव्हरटेक करीत रेखा जर यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यामध्ये रेखा जरे जागीच मृत्यू झाला आहे. चारचाकी वाहनास दुचाकीचा धक्का लागून वाद झाला व या वादातून त्यांच्या मानेवर वार केले आसल्याचे त्यांच्या मुलाने पोलीसांना सांगितले. मात्र हल्लेखोर नेमके कोण होते हे अद्याप समजु शकले नाही. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना तपासल्या नंतर पुर्वीच त्यांचा मृत्यू झाला आसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here