जामखेड प्रतिनिधी

तुमचे कुरीयर आले आहे, तुमचे पार्सल कोठे द्यायचे? असे म्हणून दुकानदारांना पैशाची टोपी घालून एक भामटा सध्या जामखेड शहरात फिरत आहे. त्यामुळे हा फसवणूक करणारा कुरीयरबॉय कोठे अढळुन आल्यास जामखेड पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

कर्जत रोडवरील एका हार्डवेअर दुकान मालकास या फसवणूक करणाऱ्या भामट्याचा दि ११ जानेवारी २०२२ रोजी फोन आला व सांगितले की तुमचे कुरीयर आले आहे कोठे ठेऊ व कुरीयर चे बील दोन हजार रुपये आले आहे. यावेळी दुकानमालक हे बाहेर आसल्याने त्यांना त्यांच्या जोडीदारकडे ठेवायला सांगितले व दोन हजार रुपये द्यायला सांगितले. दुकान मालक नंतर दुकानात आले व कुरीयर बॉक्स फोडला आसता त्या मध्ये काहीच वस्तू मिळुन आली नाही. या नंतर त्यांनी त्या कुरीयरबॉय च्या मोबाईल वरुन फोन केला आसता त्याचा मोबाईल बंद अढळुन आला. त्यामुळे कुरीयरबॉय म्हणून सध्या जामखेड शहरात कुरियरच्या नावाने लोकांची फसवणूक करत फीरत आहे असे लक्षात आले आहे. या बाबत एका ठिकाणाहून त्याचा फोटो सिसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
तरी सदर फोटो मधिल कुरीयरबॉय कोठे आढळल्यास किंवा दिसल्यास जामखेड पोलीस स्टेशन ला कळविण्याचे आवाहन जामखेड पोलीसांच्या वतीने करण्यात आले असून. त्याबाबतचा टेक्स्ट मेसेज विविध व्हाट्सअप ग्रुपवरून फिरत आहे. तरी नागरिकांनी त्याच्या पासून सावध राहावे. व तो आढळल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन जामखेड पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here