जामखेड प्रतिनिधी
ऑगस्ट 2021मध्ये झालेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लटके वस्ती (शिऊर) येथील शाळेचा विद्यार्थी पृथ्वीराज प्रमोद पिंपरे याने राज्यात 5 वा तर जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.
पाचवी मध्ये आसलेल्या शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी चि.पृथ्वीराज प्रमोद पिंपरे (286 गुण राज्यात 5 वा व जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. तर कु. प्रियंका दत्तात्रय वराट, कु. तन्वी सतिश अनभुले, कु. अंबिका भाऊसाहेब लटके, चि. साईराज दादा लटके या विद्यार्थ्यांनी देखील यश मिळवले आहे. लटकेवस्ती शाळेचा सलग 5 वर्षे शिष्यवृत्तीचा 100%निकाल लागला आहे. तसेच सलग 4 वर्षे या शाळेतील 5 विद्यार्थांची जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर येथे निवड झालेली आहे. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका अनिता विठ्ठल पवार मॅडम व श्रीमती रसिका महालिंग गाढवे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचे गटविकास अधिकारी श्री प्रकाश पोळ,गट शिक्षणाधिकारी श्री नागनाथ शिंदे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती गौतम आण्णा उतेकर, पंचायत समितीचे मा.सभापती भगवान मुरूमकर, केंद्रप्रमुख किसन वराट,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री नवनाथ लटके,उपाध्यक्ष श्री रामचंद्र लटके,सरपंच श्री हनुमंत उतेकर,ग्रामपंचायत सदस्य श्री भाऊ पिंपरे व नायगाव केंद्रातील सर्व शिक्षक
यांनी अभिनंदन केले.



