जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषेदेच्या वतीने आॕगस्ट 2021 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 8 वी शिष्यवृती परीक्षेत श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील कु.शिंदे साक्षी सुदाम या विद्यार्थिनीने 93.33% गुण मिळवून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत ग्रामीण विभागात राज्यात 2 रा तर जिल्ह्यात देखील 2 रा क्रमांक मिळविला आहे. तसेच कु.पोफळे मिताली महावीर 84.66% गुण मिळवून राज्यात 23 वी तर जिल्ह्यात 5 वी आली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा ही पुढील लोकसेवा, राज्यसेवा या स्पर्धा परीक्षांची पाया मानली जाते. ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी कोरोना काळातही खडतर अभ्यास करून हे यश मिळवले आहे. त्याच बरोबर विद्यालयातील रोडे दिपक अशोक, रोडे अनिकेत बाळासाहेब व जगताप तेजस मनेष असे 5 विद्यार्थी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय , व तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत येत विद्यालयाच्या यशाची पंरपंरा कायम राखली.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे , मार्गदर्शक शिक्षक,विभाग प्रमुख श्रीम.एस. ए.पाचपुते यांचे अभिनंदन गुरुकुल प्रकल्प प्रमुख एस.एल.शिंदे,पर्यवेक्षक डी.आर.ढवळे, विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.एस.गरड, स्थानिक स्कुल कमिटी अध्यक्ष शहाजी (आबा)पाटील व सर्व सदस्य, तसेच उत्तर विभागाचे निरीक्षक श्री.तुकाराम कन्हेरकर,सहा.निरीक्षक श्री शिवाजी तापकीर व श्री काकासाहेब वाळुंजकर , लोकप्रिय आमदार श्री रोहीतदादा पवार( जनरल बॉडी सदस्य,रयत शिक्षण संस्था), सरपंच श्री प्रशांतभाऊ शिंदे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, जवळा ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.



