जामखेड प्रतिनिधी

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधानपदी विराजमान होऊन स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी भारतातील महिलांना राजकीय सन्मान मिळवून देण्याचे काम त्याच कालावधीत मिळवून दिला. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन अनेक महिलांनी राजकारणात अनेक पदे भुषविली. देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी, सोनीया गांधी व राहुलजी गांधी यांच्या कार्याचा आदर्श घडविण्यासाठी तसेच देशाच्या राजकारणाला नवी दिशा देण्यासाठी युवकांनी मोठ्या संख्येने राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील व्हावे असे प्रतिपादन प्रा. प्रदीप (कुंडल) राळेभात यांनी व्यक्त केले.

जामखेड येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जामखेड शहर शाखेचे वतीने भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. जामखेड येथील आरोळे व नगर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून आज जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा सचिव सुनिल शिंदे, जिल्हा सेक्रेटरी जमीर सय्यद, तालुका उपाध्यक्ष प्रा. प्रदीप (कुंडल) राळेभात, जामखेड शहराध्यक्ष देवीदास भादलकर, सेवा सोसायटीचे चेअरमन अंकुश कोल्हे, मनोज डाडर, जब्बार शेख, जावेदभाई शेख, जाफर आतार, योगीराज घायतडक, शिवाजी पवळ, एकनाथ लोंढे, फकीर मदारी, महेंद्र जावळे, पोपट घायतडक, रज्जाक शेख, अशोक लोंढे, आबा बहिर, अहमद आतार यांचेसह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शहराध्यक्ष देवीदास भादलकर तर आभार जमीर सय्यद यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here